मुंबई : योग्य ती खबरदारी घेत राज्यात जुलै महिन्यापासून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची शालेय शिक्षण विभागाची तयारी आहे. शाळा कशा सुरू करता येतील यासाठी शिक्षण विभागाने मार्गदर्शक तत्वे देखील तयार केली आहेत. मात्र 15 जूनपासून शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीबद्दल शिक्षण अधिकाऱ्यांचाच गोंधळ पाहायला मिळत आहे. या संदर्भात शिक्षण संचालकांना मार्गदर्शन करण्याचे पत्र शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहे.


मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कार्यालयाचा गोंधळ उडाला असून आधी शिक्षकांनी उपस्थित रहा असे फर्मान काढले आणि आता उपस्थित राहायचे की नाही याचे मार्गदर्शन शिक्षण संचालकांकडे मागत आहेत.

शिक्षण विभागाकडून ऑनलाईन शिक्षणासाठी गाईडलाइन्स तयार; विद्यार्थ्यांचे वय, मानसिकता विचारात घेणार

शिक्षकांना शाळेत उपस्थित राहावे यासाठी 10 जून रोजी पत्रक काढले गेले. त्यानंतर अनेक शिक्षकांनी याला विरोध दर्शवत शाळा सुरू नसताना शिक्षकांना का बोलवले जात आहे ? रेल्वे, लोकलसेवा सुरू नसताना शिक्षक कसे उपस्थित राहणार ? असे प्रश्न उपस्थित करत विरोध दर्शविला होता.

School Reopen | शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याचं 10 जूनला पत्रक, 15जूनला शाळेत उपस्थिती हवी 

याआधी जे परिपत्रक निघाले त्यात शिक्षकेतर कर्मचारी आणि पेपर तपासणीसाठी शिक्षकांना शाळेत येण्यास सांगितले गेले होते. त्यामुळे 15 जून पासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या उपस्थिती बाबत शिक्षण संचालकाकडे मार्गदर्शन करावे याबाबत बीएमसी शिक्षण अधिकारी यांनी पत्र दिले आहे.

अनेक शिक्षक गावी तर बहुतांशी शिक्षक ठाणे, नवी मुंबई, पालघर व रायगड जिल्ह्यात राहतात. लोकल मेट्रो व वाहतुकीची सगळी साधने बंद असल्याने शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करू द्यावे, अशी मागणी शिक्षकांची आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप,टॅब, कुठून येणार? माजी आमदार विवेक पंडीत यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI