Second Phase Of UGC-NET Examination Postponed : नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA, विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ने राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) फेज 2 परीक्षा पुढे ढकलली आहे. यापूर्वी UGC NET फेज 2 ची परीक्षा 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2022 या कालावधीत होणार होती, परंतु आता ही परीक्षा 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे. अधिक माहितीसाठी, विद्यार्थी अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic वर जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.


परीक्षेचा पॅटर्न कसा असेल?
यूजीसी नेट परीक्षेत दोन पेपर असतील. पेपर-1 सर्व उमेदवारांसाठी समान असेल. यामध्ये 100 गुणांचे 50 प्रश्न विचारले जातील. त्याच वेळी, पेपर-2 उमेदवारांनी निवडलेल्या डोमेनचा असेल. यामध्ये 200 गुणांचे 100 प्रश्न विचारले जातील. दोन्ही पेपर सोडवण्यासाठी उमेदवारांना ३ तासांचा अवधी दिला जाईल.


20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत होणार परीक्षा


NTA ने डिसेंबर 2021 आणि जून 2022 साठी UGC NET परीक्षेसाठी पहिला टप्पा 08, 09, 11 आणि 12 जुलै रोजी घेण्यात आला आणि त्यासाठीचे प्रवेशपत्र 7 जुलै रोजी जारी करण्यात आले. आता पुढील टप्प्यातील परीक्षा 12, 13 आणि 14 ऑगस्ट रोजी होणार होती, मात्र आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ही परीक्षा 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्याच वेळी, उमेदवारांना केवळ परीक्षेसंबंधी नव्या माहितीसाठी NTA च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 


वर्षातून दोनदा घेतली जाते परीक्षा


UGC NET ही राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा आहे जी वर्षातून दोनदा घेतली जाते. COVID-19 च्या पार्श्वभूमीवर डिसेंबर 2021 परीक्षा पुढे ढकलल्यामुळे UGC NET ची जून 2022 परीक्षा देखील लांबली आहे. परीक्षा चक्र नियमित करण्यासाठी, NTA ने डिसेंबर 2021 आणि जून 2022 दोन्ही चक्र एकाच परीक्षेत विलीन केले आहेत.


संबंधित बातम्या :


Mission Admission : शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची चिंता




Education Loan Information:

Calculate Education Loan EMI