मुंबई : यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता आहे. कारण सीबीएसई, आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतरच प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरु करण्याची मागणी संबंधित बोर्डांच्या पालकांनी केली आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा अर्ज-1 भरण्यास सुरुवात झालेली असताना हा अर्ज -1 फक्त राज्य मंडळाच्याच विद्यार्थ्यांना भरता येणार आहे.इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर हा अर्ज भरायचा आहे
सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे दहावीचे निकाल जून अखेरीस किंवा जुलै महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे तर राज्य मंडळाच्या दहावीचा निकाल 20 जून पर्यंत जाहीर होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तातडीने अकरावी प्रवेशाच्या फेऱ्या सुरु कराव्यात की इतर बोर्डाचे दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर एकत्रित दरवर्षीप्रमाणे प्रवेश फेऱ्या सुरु कराव्यात यासंदर्भात अजूनही शिक्षण विभागाचा विचार सुरु आहे.
तर सर्व बोर्डाचे दहावीचे निकाल जाहीर होईपर्यंत पुढील प्रवेश प्रक्रियाचा टप्पा थांबावावा, एकत्रितरीत्या सर्वांसाठी प्रवेश फेऱ्या घ्याव्यात, अशी सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थी पालकांची मागणी आहे. असं झाल्यास दहावीचा राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी विलंब होऊ शकतो. मात्र यावर परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
- विद्यार्थ्यांनी https://11thadmission.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करायचा आहे.
- लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरुन लॉगिन करुन इयत्ता अकरावी प्रवेशासाठीच्या अर्जाचा भाग 1 भरायचा आहे.
- ऑनलाईन शुल्क भरुन फॉर्म लॉक करायचा.
- अर्ज प्रमाणित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्र निवडायचे आहे.
- मार्गदर्शन केंद्र किंवा माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी आपला अर्ज प्रमाणित करुन घ्यायचा आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI