DNB PDCET 2022 : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (DNB) मेडिकल सायन्सकडून नॅशनल बोर्डाच्या डिप्लोमा पोस्ट-डिप्लोमा सेंट्रलाइज्ड अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत साइट nbe.edu.in वर जाऊन नोंदणी करू शकतात. DNB PDCET 2022 परीक्षा रविवार 24 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. यासाठीचे प्रवेशपत्र 18 जुलै 2022 रोजी जारी केले जाईल. DNB PDCET 2022 ची अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख 12 मे 2022 आहे.
DNB PDCET 2022 साठी आवश्यक कागदपत्रं
डीएनबी पीडीसीईटी (DNB PDCET 2022) ही एक प्रवेश प्रक्रिया आहे. याद्वारे नॅशनल बोर्डाच्या डिप्लोमा पोस्ट-डिप्लोमा पाठ्यक्रमासाठी प्रवेश देण्यात येणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाते. या परीक्षेसाठी उमेदवाराला केवळ एक वेळा अर्ज नोंदणी करता येते. या परीक्षेसाठी अर्ज नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स आणि पासपोर्ट ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
DNB PDCET 2022 साठी अर्ज नोंदणी कशी कराल?
- नोंदणी प्रकियेसाठी उमेदवाराने प्रथम nbe.edu.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे.
- होम पेजवर लॉगिनचा पर्याय निवडा.
- उमेदरवाराने आपला युजर आयडी आणि पासवर्डच्या साहाय्याने साईन इन करा.
- अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्जाची फी भरा.
- पावती डाऊनलोड करा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- SSC MTS 2021 Tier 2 Exam : या दिवशी SSC MTS टियर-2 परीक्षा होणार आहे, ही महत्वाची माहिती
- MPSC Recruitment 2022 : MPSC कडून 250 पदांसाठी भरती सुरू, पात्रतेपासून अर्जाची शेवटची तारीख, सर्वकाही जाणून घ्या
- Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचं 'पाकिस्तान कनेक्शन', शाहबाज पंतप्रधान झाल्यानंतर हल्ले वाढले!
- Tina Dabi : IAS टीना दाबी झाल्या महाराष्ट्राची सून, IAS प्रदीप गवांडेंसोबत विवाहबंधनात
- Viral Video : अचानक आकाशातून समुद्रात कोसळलं विमान, पाहा व्हिडीओ
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI