CUET UG Result 2023 Latest Update : कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) 2023 ची अंतिम उत्तरपत्रिका नुकतीच जाहीर झाली. उत्तरपत्रिका जाहीर झाल्यापासून आता निकालही लवकरच लागतील असा अंदाज लावला जात होता. उमेदवार देखील निकालाची वाट पाहत आहेत. मात्र, आता UGC चे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी याबाबतचे ताजे अपडेट्स शेअर केले आहेत. या संदर्भात साधारण 17 जुलैपर्यंत CUET UG 2023 परीक्षेचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो असे त्यांनी सांगितले आहे. येत्या सोमवारपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. जे उमेदवार या वर्षीच्या CUET UG परीक्षेत बसले आहेत ते निकालानंतर NTA च्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.


निकाल तपासण्यासाठी 'या' लिंकवर जा 


CUET UG परीक्षा 2023 चा निकाल जाहीर झाल्यानंतर, हा निकाल पाहण्यासाठी उमेदवार खालीलपैकी कोणत्याही वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात.  वेबसाईट्सची लिंक खालीलप्रमाणे. 



  • cuet.samarth.ac.in

  • ntaresults.nic.in

  • nta.ac.in 


'असा' पाहा तुमचा निकाल 



  • निकाल पाहण्यासाठी, सर्वात आधी samarth.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जा. किंवा तुम्ही वर नमूद केलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जाऊ शकता.

  • येथे तुम्हाला CUET UG Scorecard 2023 नावाची डाऊनलोड लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचे लॉगिन तपशील भरायचे आहेत.  .

  • तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यांसारखे तपशील एंटर केल्यानंतर Submit या बटणावर क्लिक करा. 

  • असे केल्याने, निकाल तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर दिसेल. 

  • हा निकाल तुम्ही डाऊनलोड करू शकता. तसचे, याची प्रिंटही काढू शकता. ही हार्डकॉपी तुम्हाला भविष्यात उपयोगी पडू शकते.


'इतके' उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, CUET UG 2023 च्या परीक्षेसाठी यावेळी सुमारे 14.90 लाख विद्यार्थी परीक्षेत बसले आहेत. हे सर्व उमेदवार निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अंतिम उत्तरपत्रिका जाहीर केल्यानंतर, आता लवकरच निकाल जाहीर केले जातील. या परीक्षेद्वारे, 44 केंद्रीय विद्यापीठे आणि अनेक राज्य विद्यापीठे उमेदवारांना प्रवेश देतील. 


ही परीक्षा 13 भाषांमध्ये घेण्यात आली


CUET UG 2023 ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओरिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या 13 भाषांमध्ये आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेला भारतातील तसेच परदेशातील साधारण 15 लाख उमेदवार बसले होते. परीक्षेची उत्तरपत्रिका जाहीर झाल्यानंतर साधारण 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


CUET UG 2023 ची अंतिम उत्तरपत्रिका जाहीर; डाऊनलोड करण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI