Devendra Fadnavis : सौर प्रकल्पासाठी (Solar Project) सबस्टेशननिहाय आवश्यक जमिनीची त्वरित निश्चिती करावी, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या संदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीत फडणवीसांनी हे आदेश दिले आहेत. जमिनी निश्चित झाल्यानंतर नोडल एजन्सीला हस्तांतरित करण्यासाठी मिशनमोडवर काम करण्याचे निर्देशही देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही महत्वाकांक्षी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधील सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय आवश्यक सुयोग्य जमिनींची निश्चिती योग्यता तपासून करावी असे निर्देश दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 संदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी हे उपस्थित होते. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही राज्याची महत्वाकांक्षी योजना असल्याचे फडणवीस म्हणाले.
उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या पाच जिल्ह्यांना पारितोषिक
वातावरण बदलाचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याचे आपण सर्वजण पाहत आहोत. या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर झपाट्याने वाढला पाहिजे. यातून उद्योगांना कमी दराने वीज मिळण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धनासाठीही मदत होणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने ही योजना अतिशय उपयुक्त ठरणार असल्याने या कामांना वेग देण्यात यावा असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. महाराष्ट्र राज्याची ही महत्वाकांक्षी योजना आता केंद्र सरकारनेही स्वीकारली असल्याचे फडणवीस म्हणाले. या योजनेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या पाच जिल्ह्यांना पारितोषिक देण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
88432 एकर जागेची आवश्यकता, आत्तापर्यंत 35 हजार एकर जमीन निश्चित
या योजनेअंतर्गत कृषीभार असलेले 2731 सबस्टेशन निश्चित करण्यात आले असून या सबस्टेशनची क्षमता 17868 मेगावॅट आहे. यासाठी 88432 एकर जागेची आवश्यकता असून 35 हजार एकर जमीन निश्चित झाली आहे. 53 हजार एकर जमीन अजून निश्चित करणे अपेक्षित आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सोलर अॅग्रो कंपनी स्थापन करण्यात आली आहे. नाशिक, सोलापूर, अहमदनगर, नागपूर, धुळे-नंदुरबार ही पाच क्लस्टर पहिल्या टप्प्यात निवडण्यात आली असल्याची माहिती यावेळी फडणवीस यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या: