CUET UG 2023 Final Answer Key Released By NTA : कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) 2023 ची अंतिम उत्तरपत्रिका की जाहीर करण्यात आली आहे. जे उमेदवार परीक्षेत बसले आहेत ते अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपली उत्तरपत्रिका डाऊनलोड करू शकतात. तुमची उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) nta.ac.in. या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. यापूर्वी प्रोव्हिजनल उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली होती, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी चुकीच्या उत्तरांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर तात्पुरत्या उत्तरपत्रिका अनेक वेळा दाखवल्या गेल्या. मात्र, अंतिम उत्तरपत्रिका आज जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी तुम्ही वेबसाईटवरून उत्तरपत्रिका कशी डाऊनलोड करू शकाल याच्या काही स्टेप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


'या' तारखांना होती परीक्षा


CUET UG 2023 परीक्षा 21 मे ते 24 जून 2023 या कालावधीत अनेक टप्प्यांत घेण्यात आली. यावेळी भारतातील 387 शहरांमध्ये आणि परदेशातील 24 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी सुमारे 15 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. तुमची उत्तरपत्रिका पाहण्यासाठी काही स्टेप्स फॉलो करू शकता.  


'या' सोप्या स्टेप्ससह उत्तरपत्रिका डाऊनलोड करा



  • उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी, सर्वात आधी nta.ac.in. या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

  • त्यानंतर latest updates मध्ये गेल्यावर तुम्हाला उत्तरपत्रिकेची लिंक दिसेल.

  • या लिंकवर क्लिक करा. या ठिकाणी जे तपशील आहेत ते भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

  • त्यानंतर, CUET UG 2023 परीक्षेची उत्तरपत्रिका तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर दिसेल.

  • ही उत्तरपत्रिका एकदा तपासून पाहा आणि डाऊनलोड करा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही प्रिंट आउट देखील घेऊ शकता.

  • उत्तरपत्रिका जाहीर झाल्यानंतर तुमचा निकालही लवकरच जाहीर होऊ शकतो.

  • नवीनतम अपडेटसाठी उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाईट तपासत राहावी. या साईटवरून उमेदवारांना नवीन अपडेट्स मिळतील.


ही परीक्षा 13 भाषांमध्ये घेण्यात आली


CUET UG 2023 ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओरिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या 13 भाषांमध्ये आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेला भारतातील तसेच परदेशातील साधारण 15 लाख उमेदवार बसले होते. परीक्षेची उत्तरपत्रिका जाहीर झाल्यानंतर साधारण 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Maharashtra Education: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची अधोगती? अव्वल स्थानी असलेली महाराष्ट्राची शिक्षण थेट व्यवस्था सातव्या स्थानावर


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI