CBSE Exam Datesheet 2025 Released नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईनं दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईनं दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक cbse.gov.in या वेबसाईटवर जाहीर केलं आहे. तिथं विद्यार्थ्यांना ते पाहता येईल. सीबीएसईकडून परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येईल. तर, दहावीची परीक्षा 18 मार्चला संपणार आहे. यानंतर बारावीची परीक्षा 4 एप्रिलाला संपेल.  


दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना कित्येक दिवसांपासून वेळापत्रकाची प्रतीक्षा होती. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत लाखो विद्यार्थी सहभागी होत असतात. सीबीएसईच्या डेटशीटनुसार दहावी आणि बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारीला सुरु होईल.  


CBSE Exam Datesheet 2025: कोणत्या विषयाच्या परीक्षेनं सुरुवात


दहावीच्या परीक्षेची सुरुवात इंग्रजी विषयाच्या परीक्षेनं होईल.तर, शेवटचा पेपर माहिती तंत्रज्ञान विषयाचा असेल, या विषयाची परीक्षा 18 मार्चला संपन्न होईल. तर, बारावीच्या परीक्षेची सुरुवात शारीरिक शिक्षण विषयानं होईल. तर 4 एप्रिलला मानसशास्त्र विषयाचा पेपर असेल.   


CBSE Exam Datesheet 2025: प्रत्येक विषयात किती गुण मिळावावे लागणार?


सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत यशस्वी व्हायचं असल्यास विद्यार्थ्याला प्रत्येक विषयात किमान 33 टक्के गुण मिळवावे लागतील. दहावीचे पेपर  10:30 ते  01:30 दरम्यान आयोजित केले जातील. बारावीच्या परीक्षेची वेळ देखील हिच असेल.



CBSE Exam Datesheet 2025:दहावीच्या परीक्षेचं वेळापत्रक


इंग्रजी कम्युनिकेटिव / इंग्रजी भाषा आणि साहित्य -  15 फेब्रुवारी, 2025  
विज्ञान -  20 फेब्रुवारी 2025
फ्रेंच / संस्कृत - 22 फेब्रुवारी 2025
सामाजिक शास्त्रे -  25 फेब्रुवारी 2025
हिंदी कोर्स 'अ' / 'ब'-  28 फेब्रुवारी 2025  
गणित - 10 मार्च, 2025  
माहिती तंत्रज्ञान - 18 मार्च, 2025


CBSE Exam Datesheet 2025: बारावी परीक्षा डेटशीट


शारीरिक शिक्षण -  15 फेब्रुवारी 2025  
भौतिकशास्त्र -  21 फेब्रुवारी 2025  
व्यवसाय शिक्षण -  22 फेब्रुवारी 2025  
भूगोल -  24 फेब्रुवारी 2025  
रसायनशास्त्र -  27 फेब्रुवारी 2025  
गणित - मानक / उपयोजित गणित -  8 मार्च, 2025  
इंग्रजी वैकल्पिक / इंग्रजी आवश्यक -  11 मार्च, 2025  
अर्थशास्त्र -  19 मार्च, 2025  
राज्यशास्त्र -  22 मार्च, 2025  
जीवशास्त्र -  25 मार्च, 2025  
लेखांकन -  26 मार्च, 2025  
इतिहास -  1 अप्रैल, 2025  
मानसशास्त्र - 4 अप्रैल, 2025    


इतर बातम्या : 


PHD PET Exam in Mumbai: मुंबईत पीएचडी पूर्व परीक्षेचा खेळखंडोबा! परीक्षेची वेळ उलटून 2 तास झाले, तरीही 500 विद्यार्थी ताटकळत


दहावीच्या परीक्षेत मोठा बदल; आता 35 ला नाही तर 20 ला पास; गणित, विज्ञानात 20 गुण मिळाले तरी मिळणार अकरावीत प्रवेश


Maha TET : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात, वेळापत्रक अन् संपूर्ण माहिती, जाणून घ्या


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI