Maharashtra Election Exit Polls Result 2024 मुंबई :महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत सरासरी 58.45 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोकशाही रुद्रच्या अंदाजानुसार महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडी अन् महायुतीमध्ये कांटे की टक्कर
लोकशाही मराठी- रुद्र यांच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार दोन्ही आघाड्या सत्तेजवळ आहेत. कोणत्याही एका आघाडीला त्यांनी बहुमताच्या 144 जागांपेक्षा अधिक जागांचा अंदाज वर्तवला नाही. महायुतीला 142 जागांपर्यंत तर महाविकास आघाडीला 140 जागांजवळ जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतरांच्या खात्यात 18 ते 23 जागा जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
लोकशाही मराठी-रुद्रच्या एक्झिट पोलनुसार भाजपच्या नेतृत्त्वातील महायुतीला 128-142 जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला 125 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना 18 ते 23 जागा मिळू शकतात.
लोकशाही रुद्र नुसार कुणाला किती जागा? (पक्षनिहाय अंदाज)
महायुती - 128-142
भाजप - 80-85
शिवसेना (शिंदे गट) - 30-35
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-22
महाविकास आघाडी - 125-140
काँग्रेस- 48-55
शिवसेना (ठाकरे गट) - 39-43
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 38-42
इतर - 18-23
महाराष्ट्रात कोण किती जागा लढलं?
महाराष्ट्रात महायुतीमध्ये भाजपनं 149 जागा लढवल्या होत्या. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 85 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 54 जागा लढवल्या होत्या. महाविकास आघाडीत काँग्रेसनं 101, शिवसेना ठाकरे पक्षानं 95 तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 87 जागा लढवल्या होत्या.
प्रत्यक्ष मतमोजणी कधी ?
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आज पार पडलं आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी 23 नोव्हेंबरला पार पडणार आहे.
दरम्यान, विविध एक्झिट पोलच्या आकडेवारीचा अंदाज पाहिला असता बहुतांश पोल नुसार महायुतीचं सरकार राज्यात येऊ शकतं. तर, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. भाजपनं सर्वाधिक 149 जागा लढवल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक नुकसान सहन करावं लागू शकतं असं देखील एक्झिट पोलच्या अंदाजामधून दिसून येत आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो, अशी शक्यात एक्झिट पोलनं वर्तवली आहे.
इतर बातम्या :