CBSE Pariksha Sangam Portal: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. निकाल जाहीर करण्यापूर्वी बोर्डाने 'परीक्षा संगम' नावाचे पोर्टल सुरू केले आहे. जे येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या मोठ्या सोयीचे ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पोर्टलवर परीक्षेशी संबंधित सर्व माहिती एकाच जागी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहे. विद्यार्थी parikshasangam.cbse.gov.in या पोर्टलला भेट देऊ शकतात.
हे पोर्टल तीन मुख्य विभागांमध्ये विभागलेले आहे. ज्यात शाळा (गंगा), प्रादेशिक कार्यालय (यमुना) आणि मुख्य कार्यालयचा (सरस्वती) समावेश आहे. या तीनही विभागांची वेगवेगळी माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रादेशिक कार्यालयांच्या विभागात, विद्यार्थ्यांना कमांड, कंट्रोल आणि डेटा मॅनेजमेंट यासह इतर गोष्टींबद्दल माहिती मिळेल. शाळेच्या विभागात, विद्यार्थ्यांना परिपत्रके, अभ्यासक्रम, नमुना पेपर इत्यादी परीक्षेशी संबंधित साहित्य मिळेल. विद्यार्थी या पोर्टलद्वारे पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी त्यांची विनंती नोंदवू शकतील. या सर्वांशिवाय या पोर्टलचा वापर इयत्ता 9वी आणि 11वीच्या नोंदणी प्रक्रियेतही केला जाईल.
निकाल लवकरच जाहीर होतील
दरम्यन, या महिन्यात सीबीएसई बोर्डाकडून 10वी आणि 12वी परीक्षांचे निकाल (CBSE Board Result) जाहीर केले जातील. मात्र निकाल जाहीर करण्याबाबत बोर्डाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in वर तपासू शकतील.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- NEET PG समुपदेशन लवकरच सुरू होणार, 'ही' आहेत आवश्यक कागदपत्रे
- Maharashtra Politics NCP : शिवसेना बंडखोर आमदारांच्या हॉटेलमध्ये बेकायदेशीर प्रवेश; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना जामीन
- BJP Executive Meet : पुढील 30 ते 40 वर्ष भारतात भाजपचं युग असेल - अमित शाह
- PM Narendra Modi : उद्धव ठाकरेंनी जाता जाता जे केलं तेच पीएम मोदीही करणार? भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत दिले मोठे संकेत!
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI