CSK vs RCB : आज आयपीएलमधील चेन्नई विरुद्ध बंगळुरु सामन्यात आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू मैदानात उतरणार नाही. आरसीबीच्या 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध पार पडलेल्या सामन्यानंतर गोलंदाज हर्षल पटेलच्या (Harshal Patel) बहिणीचं निधन झालं. त्यामुळे तो आयपीएलचा बायोबबल सोडून घरी परतला असून अद्याप तो परतला नसल्याने आजचा सामना तो खेळू शकणार नाही. दरम्यान हर्षलने मागील वर्षी सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली होती. यंदाही तो कमाल कामगिरी करत असल्याचं दिसत आहे. अशामध्ये आता तो संघात नसल्याने संघाला याचा फटका बसू शकतो.
हर्षलच्या जागी आज सिद्धार्थ कौल याला गोलंदाजीसाठी मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. दरम्यान आयपीएलमधील (IPL 2022) या आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडे उत्तम खेळाडूंची फौज असली तरी आज कोणत्या खेळाडूंना अंतिम 11 मध्ये संधी मिळेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दोन्ही संघाकडून नक्की कोणते खेळाडू मैदानात उतरतील हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. पण तरी आतापर्यंतच्या खेळीच्या जोरावर कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल यावर एक नजर फिरवूया...
बंगळुरु संभाव्य अंतिम 11
अनुज रावत, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, डेविड विली, वानिंदू हसरंगा, सिद्धार्थ कौल, आकाश दीप, मोहम्मद सिराज
चेन्नई संभाव्य अंतिम 11
ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, एम.एस. धोनी (विकेटकिपर), रवींद्र जाडेजा (कर्णधार), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, मुकेश चौधरी, अॅडम मिल्ने
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- KKR vs DC Top 10 Key Points : दिल्लीचा कोलकात्यावर 44 धावांनी विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- KKR vs DC Result : टेबल टॉपर केकेआर पराभूत, दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीकडून 44 धावांनी पराभव
- CSK vs SRH Top 10 Key Points : हैदराबादचा चेन्नईवर दमदार विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha