CBSE Result 2022 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) लवकरच CBSE बोर्डाचे इयत्ता 10वी, 12वीचा निकाल जाहीर करणार आहे. सीबीएसईने घेतलेल्या बोर्डाच्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर तो बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर तपासता येईल.


विद्यार्थ्यांना निकालाची आतुरता
यावर्षी सीबीएसई 10वी आणि 12वीच्या परीक्षेत 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत. यावर्षी सीबीएसईने 26 एप्रिल ते 24 मे दरम्यान दहावीची परीक्षा घेतली होती. त्याचवेळी बोर्डातर्फे 26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत 12वी वर्गाची परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 21 लाख विद्यार्थ्यांनी 10वी आणि 14 लाख विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 15 जुलैपर्यंत 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर होऊ शकतो. 


निकाल याप्रमाणे तपासता येईल


-सर्वप्रथम, विद्यार्थ्यांना बोर्डाच्या cbse.gov.in, cbresults.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
-त्यानंतर इयत्ता 10, 12 च्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
-आता विद्यार्थी त्यांचा नोंदणी क्रमांक/रोल क्रमांक टाका.
-आता विद्यार्थ्याचा 10वी आणि 12वीचा निकाल 2022 स्क्रीनवर दिसेल.
-आता विद्यार्थी त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात.


CBSE निकाल 2022 कुठे पाहाल? 


CBSE कडून त्यांची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbresults.nic.in वर निकाल जाहीर करेल. याशिवाय विद्यार्थी डिजीलॉक वेबसाइट किंवा अॅप, उमंग अॅप आणि results.gov.in वर दहावी, बारावीचे निकाल पाहू शकतात. यावर्षी, सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी आतुरतेनं वाट पाहत आहेत. यावर्षी सीबीएसईनं 26 एप्रिल ते 24 मे दरम्यान दहावीची परीक्षा घेतली होती. त्याचवेळी बोर्डातर्फे 26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत बारावी वर्गाची परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते. यापैकी 21 लाख विद्यार्थ्यांनी दहावी तर 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



-शेवटी, विद्यार्थ्यांनी भविष्यातील गरजेसाठी निकालाची प्रिंट आऊट घ्यावी.


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI