CBSE 10th 12th Board Exam : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ पुढील सत्रापासून फक्त एकदाच दहावी आणि बारावी परीक्षा घेईल. यासोबतच नववी- दहावी आणि अकरावी- बारावीच्या परीक्षा पद्धतीतही बोर्डानं बदल केला आहे. NEP अंतर्गत परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आले आहेत. NEP ची अंमलबजावणी 2022-23 या सत्रापासून केली जाईल. त्याचवेळी, कोरोनामुळे 2021-22 सत्रात बोर्डाकडून दोनदा परीक्षा घेण्यात आली.
दहावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा पद्धतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं सीबीएसईकडून (CBSE) सांगण्यात आलं आहे. पूर्वी ज्याप्रमाणे शाळांमध्ये अंतर्गत परीक्षा होत होत्या, तशाच भविष्यातही होतील. बोर्डानं विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोविडमुळे परीक्षेचा पॅटर्न बदलावा लागल्याचंही बोर्डानं म्हटलं आहे.
सीबीएसईने केलेल्या बदलांनुसार, आता दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आकलनाच्या आधारे 40 टक्के प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना घटनेवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. यासोबतच 20 टक्के प्रश्न बहुपर्यायी आणि 40 टक्के प्रश्न लहान उत्तरांचे असतील. त्याचवेळी बोर्डानं बारावीच्या पॅटर्नमध्येही बदल केले आहेत. त्यानुसार 50 टक्के प्रश्न लहान आणि दीर्घ उत्तर प्रकारात विचारले जातील आणि 30 टक्के प्रश्न केस स्टडीवर आधारित असतील. तर 20 टक्के प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. हा पॅटर्न आल्यानं विद्यार्थ्यांना घोकमपट्टी न करता समजून घेऊन अभ्यास करावा लागेल, असा विश्वास मंडळानं व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- FYJC Admission : दहावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; अकरावी प्रवेशांचे सराव अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात
- NEET 2022: ...ही तर NEET PG परीक्षार्थींची उघड लूट; FAIMA चा गंभीर आरोप
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI