NEET Examination : NEET-PG परीक्षेच्या मुद्यावरून परीक्षार्थी डॉक्टर विद्यार्थी नाराज असल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकार NEET-PG विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले जात असल्याचा आरोप होत असताना राष्ट्रीय परीक्षा मंडळावरही आरोप करण्यात येत आहे. NEET PG परीक्षेसाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) लूट करत असल्याचा आरोप FAIMA चे अध्यक्ष डॉ. रोहन कृष्णन यांनी केला आहे.
डॉ. रोहन कृष्णन यांनी ट्वीट करून NBE वर टीकेची झोड उठवली आहे. एनबीईकडून परीक्षा शुल्काच्या नावाखाली लूट सुरू असल्याचा आरोप करणारे ट्वीट त्यांनी केले आहे. देशसेवेसाठी असणाऱ्या परीक्षेसाठी अधिक शुल्क वसुली करून लूट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील INICET, ESIC, UPSC कडून निम्म्या शुल्कात परीक्षा घेतली जाते. मात्र, एनबीईला हे शक्य होत नाही. NBE च्या अधिकाऱ्यांच्या बिझनेस क्लासच्या तिकिटांसाठी NEET-PG परीक्षार्थींनी अधिक शुल्क भरावे का असा प्रश्नही त्यांनी केला.
NEET-PG परीक्षेसाठी NBEची मोठी कमाई
डॉ. रोहन कृष्णन यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत काही माहिती मागितली होती. अर्जाच्या उत्तरात मिळालेल्या माहितीनुसार, NEET PG-2018 मध्ये परीक्षा शुल्क म्हणून 48 कोटी सात लाख, पाच हजार पाचशे रुपये जमा करण्यात आले होते. तर, NEET PG-2019 मध्ये 53 कोटी 15 लाख 55 हजार 750 रुपये इतके परीक्षा शुल्क जमा झाले असल्याची माहिती RTI मधून समोर आली आहे.
NEET PG परीक्षेवरून सरकारवर टीका
यंदा NEET PG परीक्षा 21 मे रोजी पार पडली होती. NBE कडून परीक्षेसाठी मोठी रक्कम वसूल करण्यात आली. मात्र, त्यानंतरही परीक्षार्थी विद्यार्थ्यांना 50 अंश सेल्सिअस तापमान असतानाही वातानुकूलित परीक्षा वर्ग उपलब्ध करून देता आले नसल्याची टीका डॉ. कृष्णन यांनी केली होती.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI