FYJC Result Admission : निकालाकडे लक्ष लागून असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी (Maharashtra Board SSC Result 2022) अकरावी प्रवेशाच्या अनुषंगाने आजपासून सराव अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नावनोंदणी करावी लागणार आहे. अकरावी प्रवेश अर्जासाठी 23 मे ते 27 मे दरम्यान आजपासून सराव अर्ज घेतले जाणार आहे. तर, 30 मे पासून प्रत्यक्ष अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करणे, अर्ज भरण्याचा सराव आदी 23 मे ते 27 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मॉक डेमो नोंदणी 27 मे पर्यंत करता येणार आहे. (अकरावी प्रवेशाचा सराव अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा)
विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी अकरावी प्रवेश अर्जाचा भाग-1 , 30 मे रोजीपासून भरायचा आहे. तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा चा भाग-2 भरायचा आहे. भाग-2 मध्ये विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये निवडून पसंतीक्रम नोंदवण्याची आहेत. दहावीच्या निकालानंतर भाग-2 भरण्यास सुरुवात होणार आहे.
या वर्षीपासून प्रवेश प्रक्रियेत बदल
दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाग-2 भरून त्यानंतर दरवर्षी प्रमाणे तीन नियमित फेऱ्या होतील. त्यानंतर एक विशेष फेरी होईल. या चारही फेऱ्यांमध्ये जर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही तर प्रतिक्षा यादी (वेटिंग लिस्ट) जाहीर करण्यात येणार आहे. या यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षापासून 'प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य' ही फेरी रद्द करण्यात आली आहे.
दहावी, बारावीचा निकाल कधी?
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झालं आहे. आता दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल तयार करण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे 10 जूनपर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर केला जाणार असल्याची शक्यता आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI