NEET-UG 2022 : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट युजी 2022 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत बेळगावची विद्यार्थिनी ऋचा मोहन पावशे या विद्यार्थिनीने भारतात चौथा तर कर्नाटकात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ऋचाला 715 गुण मिळाले आहेत. ऋचा हिचे माध्यमिक शिक्षण सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण आर एल एस कॉलेजमध्ये झाले आहे. ऋचाचे वडील मोहन आणि आई स्मिता हे दोघेही डॉक्टर आहेत. ऋचाचा मोठा भाऊ प्रथमेश देखील डॉक्टर आहे. पावशे घराण्याची चौथी पिढी रुग्णसेवा करत आहे.


परीक्षेत चौथा क्रमांक मिळवल्यानंतर  ऋचाने म्हणाली की, ''परीक्षेचे टेन्शन अजिबात घेऊ नका. निगेटिव्ह मार्किंग असते त्यामुळे आपल्याला खात्री असेल तरच बरोबर उत्तर द्यायला पाहिजे. प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव वेळ लावून करणे खूप आवश्यक आहे. चोवीस तास अभ्यास करत बसण्याची आवश्यकता नाही. अभ्यास करताना मात्र मन लावून करा. घरातील लोकांच्या बरोबर गप्पागोष्टी केल्या तर मन हलके होते परीक्षेचे दडपण न घेता नियमित अभ्यास करणे आवश्यक आहे.' आपल्या यशात आई, वडील, भाऊ आणि गुरुजनांचा मोठा सहभाग असल्याचे ऋचाने सांगितले.


वैद्यकीय प्रवेश परीक्षेला बसलेल्या 17.64 लाख उमेदवारांच्या यादीत राजस्थानमधील तनिष्का अव्वल ठरली आहे. दिल्लीचा वत्स आशिष बत्रा आणि नागभूषण गांगुले आणि रुचा पावशे चौथ्या क्रमांकावर आहेत. देशभरातील टॉप-50 उमेदवारांमध्ये 18 मुली आहेत, तर 32 मुलं आहेत.


NEET निकाल: टॉपर्स 10 निकाल


1: राजस्थानची तनिष्का 99.99 टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे.


2: दिल्लीचा वत्स आशिष बत्रा 715 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.


3: कर्नाटकचा हृषीकेश नागभूषण गांगुले तिसऱ्या क्रमांकावर आहे.


4: बेळगावची रुचा पावशे हिने 715 गुण मिळवले आहेत.


5: तेलंगणाचा इराबेली सिद्धार्थ राव 711 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.


6: महाराष्ट्रातील ऋषी विनय बलसे 710 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे.


7: पंजाबची अर्पिता नारंग 710 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.


8: 710 गुणांसह कर्नाटकचा कृष्णा एसआर आठव्या क्रमांकावर आहे.


9: गुजरातमधील जील विपुल व्यास 710 गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे.


10: जम्मू-काश्मीरमधील हाजिक परवीझ लोन 710 गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI