11th Admission 2022 : अकरावी प्रवेशासाठीची तिसऱ्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय प्रवेशाच्या जागांसह सर्व प्रकारच्या कोट्यातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना शनिवार (ता.20 शनिवार) पर्यंत अर्ज करता येणार आहे, अशी माहिती माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत वेळापत्रकाद्वारे देण्यात आली आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीतील प्रवेशांसाठीची मुदत मंगळवारी संपली. आज तिसऱ्या फेरीचं वेळापत्रक जारी करण्यात आले आहे, त्यानुसार गुरुवारपासून प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी सुरू करण्यात येणार असून, तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी 22 ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे.


वेळापत्रकानुसार, 18 ते 20 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग 1 आणि भाग 2 भरायचा आहे. त्यासोबत कॉलेजचे पसंती क्रमांक भाग दोन मध्ये भरायचे आहेत. विद्यार्थ्यांना कॉलेजची दहा पसंती क्रमांक देता येतील. अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी 22 ऑगस्ट सकाळी 10 वाजता जाहीर होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या पसंती क्रमांकानुसार कॉलेज प्राप्त होतील. ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीमध्ये कॉलेज मिळाले आहे त्या विद्यार्थ्यांना आपला प्रवेश 22 ते 24 ऑगस्ट या तीन दिवसात निश्चित करता येईल. तिसऱ्या फेरीनंतर विशेष फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील 25 ऑगस्ट रोजी संकेतस्थळावर प्रदर्शित केला जाणार आहे. 



 


महत्वाची सूचना -
1) ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या दोन फेरीमध्ये कोणत्याही ज्युनिअर कॉलेजमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित केला आहे. त्यांच्यासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. 
2) कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ज्युनिअर कॉलेजांनी केवळ डिजिटल पेमेंटद्वारे विद्यार्थ्यांकडून शुल्क स्वीकारावे. 


...तर त्या ठिकाणी प्रवेश घेणे अनिवार्य असेल




जर विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा नसेल तर तो विद्यार्थी पुढील फेरीसाठी थांबू शकतो. मात्र पसंती क्रमांक एक नंबरला असलेले कॉलेज विद्यार्थ्याला पहिल्या फेरीत मिळाले असेल तर त्याला त्या ठिकाणी प्रवेश घेणे अनिवार्य असेल अन्यथा त्याला एक प्रवेश फेरी प्रतिबंधित केली जाईल. जर एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश निश्चित करून त्यानंतर रद्द करायचा असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल. 




Education Loan Information:

Calculate Education Loan EMI