Yoga teacher jagdeep killed in love affair : मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणाची देशभरात चर्चा सुरु आहे. प्रेमप्रकरणात अडकलेल्या मुस्कान रस्तोगीने प्रियकर साहिल शुक्लासोबत मिळून पतीची निर्दयतेने हत्या केली होती,  हे थरकार उडवणारी घटना संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनली होती. दरम्यान, आता प्रेमप्रकरणातून निर्घृण हत्या करण्यात आल्याची एक घटना हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातून समोर आली आहे. मेरठमध्ये एका महिलेने प्रियकरासह मिळून पतीची हत्या केली होती. रोहतकमध्ये पतीने मित्रांसोबत मिळून पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या केलीये.


पत्नीच्या अफेअरचा सुगावा लागला अन् योगा टीचरला जीवंत गाडलं


वास्तविक, हे प्रकरण रोहतकच्या बाबा मस्तनाथ विद्यापीठातील योग टिचर जगदीप यांच्या हत्येचे आहे. 24 डिसेंबर रोजी जगदीपची हत्या झाली होती. आता तीन महिन्यांनंतर 24 मार्च रोजी पोलिसांना जगदीपचा मृतदेह सापडलाय. जगदीपच्या मारेकऱ्यांनी त्याला 7 फूट खोल खड्ड्यात जीवंत गाडलंय.


प्रेम प्रकरणामुळे रोहतकपासून 61 किमी अंतरावर असलेल्या चरखी दादरीच्या पंतवास गावातून  योगा टिचरचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याला 7 फूट खड्ड्यात जिवंत गाडण्यात आले. एवढेच नाही तर योगा शिक्षकाच्या अपहरणानंतर  10 दिवसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलीस 3 महिने योग शिक्षकाचा शोध घेत राहिले. बरोबर तीन महिन्यांनंतर 24 मार्च रोजी पोलिसांनी योगा टिचरचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला आणि दोन आरोपींना अटक केली.


झज्जर जिल्ह्यातील मंदोठी गावातील जगदीपचे 24 डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आले होते आणि पोलिसांना 24 मार्च रोजी त्याचा मृतदेह मिळालाय. याप्रकरणी अधिक माहिती समोर येण्यासाठी पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत. आरोपींनी मयत जगदीशला मारहाण करून हातपाय बांधून खड्ड्यात जिवंत गाडले.


जगदीप रोहतकच्या बाबा मस्तनाथ विद्यापीठात योगा टिचर होते. 24 डिसेंबर रोजी जगदीप सकाळी ड्युटीसाठी गेला आणि संध्याकाळी घरी पोहोचताच बेपत्ता झाला. प्रेमप्रकरणातून जगदीपचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर  आरोपींनी जगदीपचे हात-पाय बांधले आणि आवाज करू नये म्हणून त्याच्या तोंडाला पट्ट्या बांधल्या होत्या. रोहतकपासून 61 किमी अंतरावर असलेल्या चरखी दादरीच्या पंतावास गावात निर्जन स्थळावरील शेतात 7 फूट खड्डा खणून त्याला जिवंत गाडले.


न्यायालयात हजर करून कोठडी सुनावल्यानंतर चौकशीत धक्कादायक खुलासा झाला. प्रत्यक्षात जगदीपचे त्याच घरात एका महिलेशी प्रेमसंबंध होते, ज्या घरात तो भाड्याने राहत होता. महिलेच्या पतीला याचा संशय आला आणि त्याने जगदीपला बेदम मारहाण करून त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला कारमध्ये बसवून पंतवस गावात नेले. त्याठिकाणी खोदलेल्या 7 फूट खोल खड्ड्यात जिवंत गाडले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच


प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने 5 व्या बाळाचं नामकरण केलं, श्रीकृष्णाशी निगडीत ठेवलं नाव