Bhiwandi Crime News : केवळ भात शिजवला नाही, म्हणून नवरा बायकोमध्ये वाद झाला, हाच वाद बघता बघता विकोपाला गेला आणि अनर्थ घडलं. नवरा-बायकोच्या या वादातून नवऱ्याने बायकोची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीमध्ये समोर आला आहे. या घटनेनंतर नवऱ्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. काय घडलं नेमकं?
नवरा-बायकोमधील वाद गेला विकोपालाभिवंडी तालुक्यातील खोणी गावातील एका चाळीत भंगार व्यवसाय करणारा शंकर वाघमारे (वय, 23) हा पत्नी ज्योत्स्ना (वय, 20) सोबत एका घरात भाड्याने राहत होता. त्याचे पत्नी ज्योत्स्नासोबत वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. त्यातच जेवणात नवऱ्याने भात शिजविण्यासाठी बायकोला सांगितले. मात्र तिने भात शिजवलाच नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला कि, नवऱ्याने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात,पाठीत पोटात बेदम मारहाण केली.
बायको रक्ताच्या थारोळ्यात, नवऱ्याला अटकलाकडी दांडक्याच्या हल्ल्यात ती घरातच जमिनीवर पडल्याने तिचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी त्याच्या घरात धाव घेतली. त्यावेळी बायको रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून नवऱ्याला शेजाऱ्यांनी पकडून ठेवले. त्यानंतर घटनेची माहिती निजामपुरा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस पथक दाखल गंभीर जखमी अवस्थेत बायकोला स्वर्गीय इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत्यू घोषित केले.आणि शंकर वाघमारे याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या