Yavatmal News : यवतमाळच्या (Yavatmal News) पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) हफ्ता रखडल्याने संतप्त शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. सुदैवाने हा प्रकार वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे. झाले असे की, शेतकरी श्याम काळे यांनी थेट विषाचा डब्बा घेऊन पुसद येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठले. कवडीपूर येथे शेत असलेल्या या शेतकऱ्याचे पीएम किसानचे हप्ते रखडल्याने थेट कृषी कार्यालयात विषाचा डब्बा घेऊन ते कार्यालयात पोहचला. आपल्या तक्रारी बाबत अनेकवेळा निवेदन कृषी अधिकारी यांना देऊनही त्यावर अद्याप तोडगा निघाला नाही


परिणामी, अधिकारी केवळ वेळ काढू धोरण अवलंबित आहे. असे या शेतकऱ्याचा आरोप आहे. त्यातूनच या शेतकर्‍याने हे धाडसी पाऊल उचले आहे. मात्र वेळीच हा प्रकार रोखून श्याम काळे यांची समजूत काढल्याने हा अनर्थ टळला आहे. या प्रकारामुळे मात्र काही काळ कृषी कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.


हफ्ते खडल्याने शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल  


हल्लीचा काळ शेतकऱ्यांच्या अनुषंगाने महत्वाचा काळ आहे. राज्यात मान्सूननं एंट्री केली असून शेतीच्या कामाला वेग आले आहे. अशातच पीएम किसान योजनेचा हफ्ता रखडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशीच काहीशी परिस्थिती श्याम काळे यांची देखील आहे. वारंवार ऑफिसच्या चकरा मारून सुद्धा अधिकारी कर्मचारी दखल घेत नाही. तसेच सध्याच्या दुबार पेरणीच्या संकटामुळे ते हवालदिल झाले आहे. अधिकारी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत नाही. आर्थिक अडचणीत सापडलेले असताना पुढे हे आर्थिक संकट मोठ्या प्रमाणात ओढावेल, या भीतीने विष प्राशन करण्याचा निर्णय मी घेतला, अशी  व्यथा शेतकर्‍याने यावेळी बोलताना मांडली. यावेळी उपस्थित अधिकार्‍यांनी  या शेतकर्‍याची समजूत काढली आणि या शेतकर्‍याला आश्वस्त केल्याने हे प्रकरण निवळले आहे. 


तीन दिवसानंतर पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला


मागील आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील 30 टक्के शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन आणि तूरची लागवड केली होती. मात्र पावसाने उघड दिल्याने शेतकर्‍यांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र, मध्यरात्री आणि सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. तसेच नागरिकांची उकड्यापासून सुटका झालीय.


इतर महत्वाच्या बातम्या