Yavatmal Crime News : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेत प्रियकराने चक्क विवाहित महिलेला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत तिची हत्या केली आहे. ही घटना यवतमाळच्या राळेगाव (Crime News) परिसरातील पिंपरी दुर्ग येथील खदानी जवळ घडली आहे. तर ही घटना उजेडात येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी पुढील कारवाई सुरू केली असून या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास राळेगाव पोलीस ठाणे करीत आहे.
पैशाची मागणी केल्याने विवाहितेची हत्या
प्राथमिक माहिती नुसार, विवाहित महिलेने या घटनेतील संशयित आरोपीकडे सतत पैशाचा तगादा लावला होता. याच कारणावरून अनेकदा त्यांच्यात वाद देखील झाला होता. दरम्यान हे प्रकरण टोकाला गेलं आणि त्याचाच वचपा काढीत या प्रियकराने ही हत्या केलीय. परिणामी, आपण हत्या केल्याची कबुलीही त्याने पोलिसांकडे दिली आहे. आरती शरद कोवे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर ही महिला गावातील बाजार करण्यासाठी घराबाहेर निघाली होती. मात्र, ती उशीरापर्यंत घरी परतलीच नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी तीचा शोधाशोध केला असता ती एका निर्जन स्थळी एका झुडपात मृत अवस्थेत आढळून आली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर गावातील नागरिक आक्रमक
राळेगाव येथील विवाहित महिलेची हत्या प्रकरणात आता आदिवासी समाज संघटना आक्रमक झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा पोलीस अधीक्षक याच्या कार्यालयावर आदिवासी समाज बांधव धडकले आहेत. तर या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी या नागरिकांनी केलीय. वेळीच कठोर कारवाई न झाल्यास, मोठं आंदोलन केलं जाईल, असा इशाराही या संतप्त नागरिकांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या