Ahmadnagar Crime News : श्रीगोंदा : श्रीगोंदा (Shrigonda News) तालुक्यातील बेलवंडी (Belwandi Police Station) येथील एका घटनेनं संपूर्ण शहर हादरलं आहे. एका महिला डॉक्टरनं परिचारिकेला घरात घुसून लोखंडी रॉडनं मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पीडित परिचारिकेनं थेट पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. परिचारिकेच्या फिर्यादीवरून डॉ. माधुरी जगताप यांच्या विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अहमदनगर (Ahmadnagar News) जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे एका महिला डॉक्टरनं परिचालिकेला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका महिला डॉक्टरनं परिचारिकेला घरात घुसून लोखंडी गजानं मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. परिचारिकेच्या फिर्यादीवरून डॉ. माधुरी जगताप विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नेमकं घडलं काय? 


डॉ. माधुरी जगताप परिचारिकेच्या घरी जाऊन "तू माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर मॅसेज का करतेस?", अशी विचारणा केली. त्यानंतर सोबत आणलेल्या लोखंडी गजानं परिचारिकेला मारहाण केली. एवढंच नाहीतर "माझ्याकडे त्यांचा नंबरही नाही, मी कशाला मॅसेज करू", असं परिचारिकेनं महिला डॉक्टरला सांगितलं. मात्र, तरीही डॉ. माधुरी जगताप काही थांबल्या नाहीत. त्यांनी हातातील पाईपमध्ये लोखंडी गज टाकून परिचारिकेला मारहाण सुरूच ठेवली. याप्रकरणी परिचारिकेनं महिला डॉक्टरविरोधात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी फिर्यादीच्या आधारावर गुन्हाही दाखल केला आहे. 


पीडित परिचारिकेनं फिर्यादीत सांगितल्यानुसार, महिला डॉक्टरनं लोखंडी गजानं जबर मारहाण केलीच, पण त्यासोबतच "पुन्हा जर नादी लागली तर फाशी देऊन मारीन... गावात राहिली तर सुपारी देऊन मारून टाकीन... कोणत्याही हॉस्पिटलमध्ये काम करू देणार नाही...", अशा धमक्याही वारंवार परिचारिकेला दिल्या आहेत. परिचारिकेच्या फिर्यादीवरून डॉ. माधुरी जगताप विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.