मुंबई : गेल्या आठवड्यात शेअर बाजाराच कमी-अधिक प्रमाणात चढउतार पाहायला मिळाले. आठवड्यातील शेवटच्या सत्रात म्हणजेच शुक्रवारी (24 मे) शेअर बाजारात साधारण घसरण झाली. बीएसई सेन्सेक्स 8 अंकांनी घसरून 75410 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 11 अंकांनी घसरून 22957 अंकांवर स्थिरावला. दरम्यान, गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवशी निफ्टी आणि सेन्सेक्सने ऐतिहासिक कामगिरी केली होती. 


कोणते शेअर टॉप गेनर, कोणते शेअर टॉप लुझर


गेल्या आठवड्यात शेअर बाजारात टॉप गेनर्सच्या यादीत एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, लार्सन, बीपीसीएल, कोल इंडिया, अल्ट्राटेक सीमेंट आणि अॅक्सिस बँक यांच्या शेअरचा समावेश होता. तर टॉप लुजर्समध्ये अडाणी पोर्ट्स, टाटा कंझ्यूमर, महिंद्रा, टेक महिंद्रा, टायटन, एशियन पेन्ट्स आणि टीसीएस यांचा समावेश आहे. दरम्यान, सोमवारीदेखील पेनी स्टॉक्सच्या माध्यमातून चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. तुमच्याकडे खालील दहा शेअर असल्यास तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. 


Gujarat Cotex Ltd ये कंपनीच्या शेअरचा दर शुक्रवारी 5.68 होता. या शेअरमध्ये शुक्रवारी 4.99 टक्क्यांची तेजी पाहायला मिळली. 


Zee Learn Ltd या कंपनीचा शेअर शुक्रवारी 6.53 रुपयांवर पोहोचला. या शेअरमध्ये साधारण 4.98 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.


Brightcom Group Ltd या शेअरचा दर शुक्रवारी 9.49 रुपयांवर पोहोचला. या शेअरमध्ये 4.98 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.


Millennium Online Solutions India Ltd हा शेअर शुक्रवारी 4.96 टक्क्यांच्या वाढीसह 3.6 रुपयांवर पोहोचला होता. 


Gayatri Projects Ltd या कंपनीचा शेअर 4.96 टक्क्यांच्या तेजीसह 8.04 रुपयांवर पोहोचला. 


MFS Intercorp Ltd हा शेअर शुक्रवारी 8.49 रुपयांवर पोहोचला. शुक्रवारी या शेअरमध्ये 4.94 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. 


Gala Global Products Ltd या कंपनीचा शेअर शुक्रवारी 3.83 रुपये होता. या शेअरमध्ये शुक्रवारी 4.93 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. 


Polytex India Ltd या कंपनीच्या शेअरचे मूल्य शुक्रवारी 9.16 रुपयांवर पोहोचले. शुक्रवारीया शेअरमध्ये 4.93 टक्क्यांनी वाढ झाली. 


Baroda Extrusion Ltd या कंपनीच्या शेअरमध्ये 4.92 टक्क्यांच्या वाढीसह 5.97 रुपयांची वाढ झाली.


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


माही भाई आता दिसणार नव्या भूमिकेत, 'या' कंपनीशी केला महत्त्वाचा करार!


जून महिन्यात बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या! जाणून घ्या कोणत्या दिवशी बँका राहणार बंद