Whale vomit, Kalyan : व्हेल माशाची उलटी (Whale vomit) विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना कल्याण (Kalyan) क्राईम ब्रँचने सापळा रचत बेड्या ठोकल्यात. अनिल भोसले ,अंकुश माळी ,लक्ष्मण पाटील अशी तिघा आरोपींची नावे आहेत. तिघे पनवेल परिसरात राहणारे आहेत. त्यांच्याजवळून सुमारे 6 कोटी 20 लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. त्यांनी उलटी कुठून आणली ,कुणाला विक्री करण्यासाठी आणली याचा तपास कल्याण क्राईम ब्रँच करत आहे.
बदलापूर पाईपलाईन रोडवर येणार असल्याची माहिती अन् पोलिसांनी सापळा रचला
अधिकची माहिती अशी की, व्हेल माशाची उलटीची अनधिकृतरित्या विक्री करण्यासाठी काही इसम एका कारमधून बदलापूर पाईपलाईन रोडवर येणार असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाने बदलापूर पाईपलाईन रोडवर सापळा रचला. संशयित गाडी दिसताच गाडी थांबवून गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये व्हेल माशाची उलटी आढळली. कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाने तत्काळ गाडी मधील अनिल भोसले ,अंकुश माळी ,लक्ष्मण पाटील या तिघांना ताब्यात घेत अटक केली. सुमारे सहा कोटी 20 लाखांची उलटी व कार जप्त केली. या तिघांनी उलटी कुठून आणली कुणाला विक्री करण्यासाठी आणली याचा तपास कल्याण क्राईम ब्रँचचे पथक करत आहे.
आरोपी उलटीचं काय करतात?
व्हेल माशाची उलटी ही अत्यंत दुर्मिळ असून, ती अत्तर किंवा सुगंधित उत्पादनासाठी वापरतात. नैसर्गिकरित्या जास्त काळ टिकणाऱ्या अत्तरासाठी या उलटीचा वापर केला जातो. यामुळे बाजारात व्हेल माशाच्या उलटीला कोट्यावधी रुपयांची किंमत आहे. तसेच ही उलटी काही औषधांमध्येही वापरली जाते. त्यामुळे व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचे प्रकार वाढले आहेत.
यापूर्वी चिपळूणमध्येही व्हेल माश्याचा उलटीच्या तस्करीचा अशाच प्रकार समोर आला होता. याप्रकरणात एक बीएचएमस डॉक्टरला अटक करण्यात आली होता. या प्रकरणात 10 किलो उलटी पोलिसांनी जप्त केली होती. तर चार आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले होते. आरोपींना कोर्टात हजर करून पोलिसांनी कस्टडीची मागणी केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या