Walmik Karad Surrender : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरणाचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र, आता वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडी (Pune CID) कार्यालयात आत्मसमर्पण केले आहे. 


वाल्मिक कराड आज सीआयडीसमोर शरणागती पत्कारण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर सीआयडी कार्यालयात पुणे पोलीस दलातील पोलीस उपायुक्त सौदीपसींग गील आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे दाखल झाले होते. वाल्मिक कराड सीआयडीला शरण आल्यास त्यांच्या समर्थकांची गर्दी होऊ शकते हे लक्षात घेऊन पुणे पोलीसांकडून सीआयडी कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला. 


पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?


तर वाल्मिक कराडने पुण्यात शरण येण्यापूर्वी एक व्हिडिओ जारी केला. वाल्मिक कराडने व्हिडिओमध्ये त्याची बाजू मांडली. यानंतर तो पुण्यातील सीआयडी कार्यालयात कारमध्ये दाखल झाला. वाल्मीक कराड सीआयडी कार्यालयात दाखल होताना त्याच्या खासगी मालकीच्या गाडीने दाखल झाला. सीआयडी कार्यालयाबाहेर वाल्मिक कराडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. वाल्मिक कराड शरण झाल्यानंतर कायदा व्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, त्यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 



व्हिडिओमध्ये काय म्हणाला वाल्मिक कराड? 


वाल्मिक कराड याने व्हिडिओत म्हटले आहे की, मी वाल्मीक कराड, माझ्या विरोधात केज पोलीस स्टेशन मध्ये खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय रोषामुळे माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे. पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी, मी शिक्षा भोगायला तयार आहे, असं वाल्मिक कराडने स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Walmik Karad: आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?


Walmik Karad: वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर करण्याची कुणकुण लागतात सुरेश धस मुंबईत फडणवीसांच्या भेटीला निघाले