Xiaomi 12 Pro 5G : Xiaomi  कंपनीचा  Xiaomi 12 Pro 5G हा स्मार्टफोन गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. आता हा फोन भारतामध्ये देखील लाँच केला जाणार आहे.  Xiaomi कंपनीनं त्यांच्या या स्मार्टफोनचा एक व्हिडीओ  ट्विटरवर शेअर करून नेटकऱ्यांना या फोनच्या लाँचबद्दल माहिती दिली आहे. 


Xiaomi India या ट्विटर अकाऊंटवरून  Xiaomi 12 Pro 5G या फोनचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये द शो स्टोपर असं लिहलेलं दिसत आहे. 'हे तेच आहे ना ज्याची तुम्ही उत्सुकतेनं वाट पाहात होता.  Xiaomi 12 Pro 5G हा फोन 27 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे. तारिख लक्षात ठेवा. ', असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. 






Xiaomi 12 Pro 5G फोनचे  स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये 6.67 इंच 2K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन eight जेन 1 SoC ने ऑपरेट केला जाईल.  12GB रॅम आणि 256GB स्टोरेज या फोनमध्ये दिले जाईल. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 4600mAh बॅटरी सेट केली आहे.


महत्वाच्या बातम्या :