Vasai Crime News वसई : महाराष्ट्र सरकारच्या अन्न औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. यात बनावट औषधे बनवणाऱ्या कंपनीचा गोरखधंदा उघड करण्यात अन्न औषध प्रशासनाला (Food and Drug Administration) मोठे यश आले आहे. या कारवाईत तब्बल 1 करोड 41 लाखांच्या बनावट औषधांसह मोठ्या प्रमाणात इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 10 जुलै रोजी वसईच्या (Vasai Crime) गहरवार फार्मा प्रोडक्टस प्रा.लि. कंपनीवर धाड टाकून 1 करोड 41 लाखांची औषधे आणि त्याला लागणा-या मशिनीरी, कच्चा माल, पॅकिंग मटेरियल, लेबल्स इत्यादी वस्तू जप्त केल्या आहेत. दरम्यान एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश एफडीएने केला आहे.
बनावट औषधे बनवणाऱ्या कंपनीचा गोरखधंदा उघड
प्राप्त माहितीनुसार परवाना रद्द झाला असताना ही कंपनी औषधे उत्पादन करुन ते वितरित करीत होती. वसईच्या गहरवार फार्मा प्रोडक्टस प्रा.लि.या कंपनीने हरयाणा येथील आयुर्वेदिक औषध उत्पादनाकरीता नियमाप्रमाणे परवाना घेतला होता. मात्र हा परवाना 14 मे 2024 रोजी रद्द झाला. दरम्यान हा परवाना रद्द झाला असला तरी, याच परवान्याचा वापर करुन वसई येथे अवैद्य रित्या ते औषधे बनवत होते. या परवाना अंतर्गत ते जालंधर येथील ओंकार फार्मा यांना औषधे विक्री आणि वितरण करत असल्याच दाखवत होते. परंतु ही कंपनी वसई येथेच होती. वसईहून औषध उत्पादन करुन, बिलावर जालंधर येथील पत्त्याचा ते उल्लेख करत औषध विक्रि करीत होते. ओंकार फार्मा यांच्या वसई येथे धाडीत काही औषधे असे आढळून आले आहेत की ज्यांच्या औषधाच्या लेबलवर गहरवार फार्मा वसई, पालघर म्हणून नाव नमूद होतं आणि त्याची उत्पादने दिनांक जानेवारी 2024 अशी नमूद केली होती.
परवाना रद्द झाला असतानाही औषधांचे उत्पादना
या ठिकाणी केलेल्या कारवाईत ऋषभ मेडिसीन यांचा आयुर्वेदिक औषध उत्पादन करीता परवाना होता. मात्र तो परवाना 2022 रोजीच रद्द झाला होता. याच कंपनीविरुध्द मार्च 2024 मध्ये नवघर वसई येथे विना परवाना आयुर्वेदिक औषध उत्पादन केल्याप्रकरणी, तसेच आयुर्वेदिक औषधांमध्ये एलोपॅथी औषध मिश्रण केल्याप्रकरणी औषध जप्तीची कारवाई करण्यात आली होती. तसेच त्याची भागिदारी संस्था ऋषभ मेडिसीन नवघर वसई यांच्या विरुध्द 2021 मध्ये आयुर्वेदिक औषधांमध्ये एलोपॅथी औषध मिश्रण केल्याप्रकरणी औषध जप्तीची कारवाई करण्यात आली होती. तसेत कोर्टात खटला ही दाखला केला होता.
सध्या एफडीए या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे. घटनास्थळी टाकलेल्या छाप्यानुसार, बनावट औषधे बनवणारी कंपनी अनेक डुप्लिकेट उत्पादने बनवून विकत असल्याचे तपासात उघड होणार आहे. त्याच्या तारा कुठे जोडल्या आहेत, त्याचा ही तपास आता होणार असल्याची माहीती एफडीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हे ही वाचा