Vasai Crime: पुष्पा चित्रपटाची सगळीकडे हवा आहे. आंध्र प्रदेशमधील जंगलातून मोठ्या प्रमाणात चंदनाची (Sandalwood) तस्करी कशी केली जाते? यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. मात्र वसईमध्ये रक्तचंदनाच्या तस्करीची खरीखुरी भांडाफोड झाली आहे. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामण चौकी येथे रक्तचंदन तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड पोलीसांना यश मिळाले आहे. यामध्ये पोलिसांनी कोट्यावधी रुपयांच्या रक्तचंदनसह दोन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामण-भिंवडी रोड वरुन एक कंटेनर संशयास्पद माल घेऊन जाणार असल्याची माहिती वालीव पोलिसांना मिळाली. वालीव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेली कामण चौकीतील पोलीस कर्मचा-यांनी पहाटेच्या सुमारास गस्त लावून, एका संशयास्पद कंटेनरला अडवून, चौकशी केली. चौकशी केल्यानंततर त्या कंटेनरमध्ये अंदाजे 30 ते 35 घन मीटर चंदनाचा साठा पोलिसांना आढळून आला. कंटेनरमध्ये पुढे कांद्याच्या गोणी तर मागे रक्तचंदनाच्या लाकडाचे ओडंके होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या रक्तचंदनाची अंदाजे सहा कोटी एवढी किंमत आहे. मांडवी वन विभागाने रक्त चंदनाची पुष्टी करुन, पंचनामा सुरु केला आहे.
हे रक्तचंदन आंध्र प्रदेशातून आल्याच अंदाजे पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे रक्तचंदन मुंबईतून भिवंडी मार्गे नावाशिवा बंदरातून आंतरराष्ट्रीय बाजारात नेणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. सध्या वालीव पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी या रक्तचंदना बाबात अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणातील हे रक्तचंदनाचे ओंडके कुठे नेले जात होते? यामागचा पुष्पा कोण? याची माहिती पोलिसांना अजून मिळालेली नाही. दुसरीकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील या रक्तचंदनाबद्दल अधिक माहिती देत, याचा वापर औषधासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात, असल्याची माहिती दिली आहे. रक्तचंदनाच्या तस्करीवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे मुंबईतून भिवंडी मार्गे नावाशिवा बंदरातून आंतरराष्ट्रीय बाजारात घेऊन जाणाऱ्या या अति दुर्मिळ रक्तचंदन तस्करीचे धागेदोरे कुठंपर्यंत आहेत? याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
रक्त चंदनाचा उपयोग आणखी कशाकरता होतो?
रक्तचंदन हे विशेषता तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशमधील चित्तुर, कडप्पा, कुरनुल आणि नेल्लोर चार जिल्ह्यांमध्ये आढळतात. ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर, संयुक्त अमिरात इत्यादी ठिकाणी याचा मोठा व्यापार होतो. उच्च प्रतिची दारू, मूर्तीकलेचा वापर, तसेच आयुर्वेदामध्ये देखील याचा सुज किंवा मुकामार लागल्यास रक्त चंदनाचा वापर केला जात असल्याची माहिती जाणकार देतात.
संबंधित बातम्या: