Yashshree Shinde Murder : उरण हत्याकांडाचं कारण समोर आलं असून यशश्रीने लग्नाला नकार देत असल्यानं दाऊद शेखनेचं तिला संपवल्याचं पोलिस तपासात उघड झालंय. दोन दिवसांपूर्वी दाऊदला कर्नाटकातून बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिस तपासात दाऊदने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात काय झालं? आरोपीने आपल्या कबुली जबाबात काय म्हटलं? नेमकं हे प्रकरण काय? हे सविस्तर पाहूयात,
उरणमध्ये झालेल्या हत्याकांडानं संपू्र्ण महाराष्ट्र हादरुन गेला. उरणची राहणारी यशश्री शिंदे हिची तिचा मित्र दाऊद शेखने धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. 30 जुलैला पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातील गुलबर्ग्यातून अटक केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी दाऊद बोलता झाला.
लग्नाला नकार दिल्याने हत्या
25 जुलै रोजी दाऊद आणि यशश्रीची भेट झाली. या भेटीत दोघांमध्ये जोरदार खटके उडाले. आपल्यासोबत पळून येण्यासाठी दाऊद यशश्रीला जबरदस्ती करत होता. यशश्री मात्र दाऊदसोबत जाण्यास तयार नव्हती. दाऊद आपल्या भूमिकेवर ठाम होता. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यशश्री सोबत येत नसल्यानं दाऊदला राग अनावर झाला. रागात त्याने यशश्रीवर वार केले आणि ती रक्तबंबाळ झाली. यशश्रीने नकार दिल्याने रागाने दाऊद संतापला आणि त्याने यशश्रीवर सपासप वार केले. दाऊदने तिचा चेहरा छिन्नविच्छिन्न केला. यात शेवटी यशश्री मरण पावली.
यशश्रीला संपवण्याचा पूर्वनियोजीत कट
यशश्री उरणमध्ये राहायला होती. पूर्वी दाऊदही उरण परिसरात राहायला होता. कोवीड काळात जेलमधून सुटल्यानंतर तो कर्नाटकात राहायला गेला. यादरम्यान तो यशश्रीच्या संपर्कात होता.
दाऊद 22 जुलै रोजी यशश्रीला भेटण्यासाठी निघाला. आपल्यासोबत त्याने एक धारदार शस्त्र घेतलं. 23 जुलै रोजी तो नवी मुंबईत दाखल झाला. 23 आणि 24 तारखेला तो यशश्रीला भेटण्यासाठी बोलवत होता. यशश्री भेटायला तयार नव्हती. 25 जुलैला यशश्री दाऊदला भेटली. साधारण 1-2 तास दोघं भेटले, त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. तो तिला आपल्यासोबत पळून येण्यास जबरदस्ती करत होता. लग्न करुन बेंगळुरूला राहू, तिकडे नवीन संसार थाटू असा आग्रह त्याने धरला होता. मात्र यशश्री या सगळ्याला तयार नव्हती. तिचा नकार होकारात बदलला नाही हे पाहून त्याने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात यशश्रीचा मृत्यू झाला.
दाऊदविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा
दाऊद आणि यशश्री दोघं एकमेकांना 2015 पासून ओळखत होते. दोघं शाळेत एकत्र होते. शाळा संपल्यानतंर यशश्री कॉलेजला जाऊ लागली. दरम्यान दाऊद तिला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. या सगळ्याला यशश्रीच्या आई-वडिलांचा विरोध होता. 2019 मध्ये यशश्री अल्पवयीन असल्यानं तिच्या वडिलांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत दाऊदविरोधात तक्रार केली.
दाऊद जेलमध्ये गेला. कोविडकाळात तो बेलवर सुटला आणि पुन्हा बंगळुरूला गेला. काही काळाने त्याने पुन्हा यशश्रीला संपर्क केला. दाऊद यशश्रीला भेटण्यासाठी वारंवार आग्रह करत होता. तुझे फोटो व्हायरल करेन अशा धमक्या द्यायचा. दोघं एकमेकांच्या संपर्कात होते, मात्र यशश्रीचा त्याला भेटण्याला विरोध असायचा. काही वेळा यशश्रीने दाऊदचा नंबर देखील ब्लॉक केला होता. अशावेळी दाऊद आपला मित्र मोहसिनच्या फोनवरुन तिला संपर्क साधायचा.
शेवटच्या भेटीत त्यानं सोबत पळून येण्यासाठी तिच्याकडे तगादा लावला होता. लग्न करुन बंगळुरूला राहू, तिकडे नवीन संसार थाटू असा अग्रह धरला होता. यशश्री मात्र पळून जाण्यास तयार नव्हती. यशश्रीचा नकार दाऊदला पचला नाही अन् रागाच्या भरात त्यानं यशश्री संपवलं.
ही बातमी वाचा: