UP crime : उत्तर प्रदेशातील बागपत येथील ब्रह्माकुमारी (Bramhakumari) आश्रमात एका तरुणीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. बागपतच्या तातिरी येथील ब्रह्मा कुमारी आश्रमात तरुणीचा मृतदेह आढळून आला. आता मृत महिलेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी आश्रमातील लोकांवर खुनाचा आरोप केला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आग्राच्या ब्रह्माकुमारी आश्रमात दोन सख्ख्या बहिणींनी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर ब्रह्माकुमारी आश्रम चर्चेत आलंय.
आश्रमातील लोकांकडून आर्थिक आणि मानसिक छळ?
ही घटना गुरुवारी घडली. मृत तरुणीचे नाव शिल्पा आहे, 25 वर्षीय शिल्पाचा मृतदेह प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विद्यापीठाच्या बंद खोलीत आढळून आला. महिलेच्या कुटुंबीयांनी मुलीवर हत्येचा आरोप केला असून आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत हत्येचा आरोप करत कुटुंबीयांनी एकच गोंधळ घातला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोरी कापून शिल्पाचा मृतदेह खाली आणला. शिल्पाचा भाऊ उज्ज्वल याने आश्रमातील लोक आपल्या बहिणीचा आर्थिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे.
ब्रह्माकुमारी आश्रम पुन्हा चर्चेत
मृत शिल्पाचा भाऊ उज्ज्वलने सांगितले की, त्याच् वडील जगत सिंह यांचे 2015 मध्ये निधन झाले होते. 5 मार्चला जेव्हा शिल्पासोबत बोलणं झालं तेव्हा तिने आपल्याला मारहाण होत असल्याचे सांगितले. उज्ज्वलला आठ बहिणी आहेत. त्यांचा एक मोठा भाऊ ऑस्ट्रेलियात एमबीएचे शिक्षण घेत आहे. आग्र्यापाठोपाठ बागपतच्या आश्रमातील मुलीच्या मृत्यूनंतर ब्रह्मा कुमारी आश्रम पुन्हा चर्चेत आला आहे. 25 वर्षीय शिल्पाने ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यापीठात शिक्षण घेत होती. बंद खोलीत तिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. शिल्पाचा भाऊ उज्ज्वल सांगतो की, त्याच्या बहिणीवर घरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता.आश्रमात मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या पोलीस आश्रमातील महिलेच्या मृत्यूचे कारण शोधण्यात व्यस्त आहेत.
आग्र्यातील ब्रह्मा कुमारी आश्रमात दोन बहिणींचे मृतदेह आढळले.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आग्राच्या ब्रह्माकुमारी आश्रमात दोन सख्ख्या बहिणींनी गळफास लावून आत्महत्या केली होती. आग्रा येथील ब्रह्मा कुमारी आश्रमात आत्महत्या केलेल्या एकता (वय ३८) आणि शिखा (वय 32) या तंतपूर येथील अशोक कुमार सिंघल यांच्या मुली होत्या. दोन्ही सख्ख्या बहिणींनी आत्महत्या करण्यापूर्वी तीन पानांची सुसाईड नोट लिहिली होती. चिठ्ठीनुसार आश्रमातील चार जणांना आत्महत्येसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. सुसाइड नोटमध्ये दोन्ही बहिणींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली होती.
हेही वाचा>>>
Delhi Crime : लग्नघटिका समीप होती, लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाला चाकूने भोसकले, लग्नघरातच अचानक शोककळा पसरली