Delhi Crime : एका दिवस आधी लग्न होणार होतं. लग्न होणार, नवीन आयुष्याची सुरूवात होणार म्हणून तो स्वप्न रंगवत होता, पण नियतीला ते कदाचित मान्य नव्हतं, लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाला चाकूने भोसकल्याने गुरुवारच्या मध्यरात्रीच दक्षिण दिल्ली (Delhi) हादरली. पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणाच्या चेहऱ्यावर आणि छातीवर तब्बल 15 वार करण्यात आले. हत्येच्या घटना घडल्यानंतर मृताचे वडील फरार आहेत. पोलीस त्याच्या शोधात व्यस्त आहेत.


पोलिसांना त्या रात्री पीसीआर कॉल आला होता


गुरुवारच्या मध्यरात्री दक्षिण दिल्लीतील देवली एक्स्टेंशन भागात एका जिम ट्रेनरची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, रात्री 12.30 वाजता पोलिसांना राजू पार्क परिसरात एका हत्येबाबत पीसीआर कॉल आला होता. गौरव सिंघल असे मृत्यू झालेल्या जिम ट्रेनरचे नाव आहे. लग्नाची तयारी सुरू असतानाच अचानक त्यांच्या लग्नघरात शोककळा पसरली. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र हत्येचे कारण आणि हेतू अद्याप समजू शकलेले नाही.


एक दिवस आधी होणार होता त्याचा विवाह


या हत्येप्रकरणी पीटीआयला माहिती देताना दिल्ली पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 29 वर्षीय गौरव सिंघल हा जिम ट्रेनर होता. तो दिल्लीतील देवळी एक्स्टेंशन भागात राहत होता. त्याचा विवाह गुरुवारी होणार होता. त्यांच्या घरी पाहुणे व नातेवाईक उपस्थित होते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, जिम ट्रेनर गौरव सिंघल यांची बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री दक्षिण दिल्लीतील देवली एक्स्टेंशन भागात त्यांच्या घरी चाकूने वार करून हत्या करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्या रात्री 12.30 वाजता पोलिसांना राजू पार्क परिसरात एका हत्येबाबत पीसीआर कॉल आला होता.


हत्येमागील कारण अद्यापही गुलदस्त्यातच..


पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर गौरव सिंघल यांच्या कुटुंबीयांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्सच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.


मृत तरुणाचा वडिलांसोबत वाद


पोलिसांच्या माहितीनुसार, मृत तरुणाचा त्याच्या वडिलांसोबत काही वाद सुरू असून, घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. ज्या वेळी जिम ट्रेनरची हत्या झाली, त्या वेळी घराजवळ ढोल वाजवले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी मृताचा लहान भाऊ आणि त्याच्या नातेवाईकाला ताब्यात घेतले आहे. घटनेचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत.


 


हेही वाचा>>>


Karvele Viral Video : धक्कादायक! भुताटकीच्या संशयातून 75 वर्षीय वृद्धाला आगीच्या निखाऱ्यावर नाचवले, वृद्ध होरपळून गंभीर