UP Crime : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील रोशनपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इथे आईच्या सांगण्यावरून मुलांनी वडिलांची हत्या केली. पोलिसांनी आरोपी मुलं आणि पत्नीला अटक केली आहे. मालमत्तेच्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. काय घडलं नेमकं? जाणून घ्या


पती-पत्नीमधील वाद, दोन्ही मुलांसह पत्नी वेगळी राहू लागली


उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये संपत्तीच्या वादातून पत्नीने मुलासह पतीची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी आणि दोन मुलांना अटक केली आहे. पती-पत्नीमधील वादामुळे 12 वर्षांपूर्वी पत्नी दोन्ही मुलांसह वेगळे राहू लागली. पतीने 6 महिन्यांपूर्वी तिला न सांगता गावातील घर विकले होते. यानंतर पत्नीने सुरतमध्ये राहणाऱ्या दोन मुलांना बोलावून पतीच्या हत्येचा कट रचला. यानंतर दोन्ही मुलांनी कूपनलिकाजवळ झोपलेल्या वडिलांची हत्या केली.


 


दोन दिवसांपूर्वी वडिलांचा मृतदेह शेतात सापडला


मिळालेल्या माहितीनुसार, जेहानाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोशनपूर गावात दोन दिवसांपूर्वी 43 वर्षीय हरिश्चंद्र यांचा मृतदेह शेतात बांधलेल्या झोपडीत सापडला होता. या प्रकरणी मृताच्या लहान भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, मृत हरिश्चंद्र आणि त्यांची पत्नी निर्मला देवी यांच्यात 12 वर्षांपूर्वी वैयक्तिक वाद झाल्याचे समोर आले. त्यांची दोन मुले राजकुमार आणि शिवकुमार यांच्यासोबत वेगळी राहत होती. गावातील घरात हरिश्चंद्र एकटाच राहत होता. हत्येनंतर पोलिसांनी हरिश्चंद्रची पत्नी आणि दोन मुलांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, मुलांनी संपूर्ण हकीकत सांगितली.


 


चौकशीदरम्यान आरोपीने संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली


पोलिसांनी केलेल्या चौकशीत हरिश्चंद्रच्या मुलांनी सांगितले की, आई विभक्त झाल्यानंतर वडील गावात बांधलेल्या घरात एकटेच राहत होते. सहा महिन्यांपूर्वी वडिलांनी गावातील रहिवासी कैलास याला 1 लाख 40 हजार रुपयांना घर विकले होते. आईला याची माहिती मिळाली, आणि तिने आपल्या मुलांना याबाबत सांगितले. आईच्या सल्ल्यानुसार दोन मुलांनी आईसोबतच वडिलांची हत्या करण्याचा कट रचला. यानंतर 13 फेब्रुवारीच्या रात्री शेतातील कूपनलिकाजवळ झोपलेल्या अवस्थेत वडिलांचा खून करण्यात आला.


 


या घटनेबाबत पोलीस अधीक्षकांनी काय सांगितले?


पोलीस अधिकारी उदय शंकर सिंह यांनी सांगितले की, 14 फेब्रुवारी रोजी जहानाबाद पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली होती की, रोशनपूर गावातील एका शेतात हरिश्चंद्र नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कसून चौकशी केली. या वेळी मृताची दोन्ही मुले गुजरातमध्ये राहत असल्याचे उघड झाले, ते गुजरातहून घटनास्थळी आले आणि त्यांनीच ही घटना घडवून आणली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेच्या कटात सहभागी असलेल्या मृताच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. या घटनेत वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे


 


हेही वाचा>>>


Crime : मामी-भाच्याच्या प्रेमसंबंधात मामाचा 'गेम', 6 वर्षाच्या मुलाने केला 'असा' खुलासा, 12 तासांतच पोलिसांनी केला पर्दाफाश