भोपाळ : देशाला हादरवणाऱ्या उज्जैनमधील बलात्कार प्रकरणात (Ujjain Rape Case News Update) एका रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपी ऑटोचालकही जखमी झाला, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहकारी ऑटो चालकावर पुरावे लपवल्याचा आरोपही केला आहे.
उज्जैनमध्ये 25 सप्टेंबर रोजी एका 12 वर्षाच्या मुलीवर महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली होती. या मुलीवर निर्भया घटनेप्रमाणेच अत्याचार झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कार झाल्यानंतर पीडित बालिका जवळपास अडीच तास रक्तबंबाळ अवस्थेत मदतीसाठी दारोदार अर्धनग्नावस्थेत फिरत होती. पीडिता मदत मागत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि त्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी आता उज्जैन पोलिसांनी एका रिक्षा चालकाला अटक केली आहे.
Ujjain Rape Case News Update : आरोपीला बेड्या
आरोपी रिक्षाचालकाने पीडितेवर बलात्कार केला आणि नंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने गाडीचा नंबर बदलला. एवढेच नाही तर आरोपीने त्याचा मोबाईलही बंद केला. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक पुराव्याच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे. आरोपी भरत हा नानाखेडा परिसरात राहणारा असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न
पोलिस अधीक्षक सचिन शर्मा यांनी सांगितले की, आरोपीला घटनास्थळी नेले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तो खाली पडला आणि जखमी झाला, तर दोन पोलिसही हाणामारीत जखमी झाले. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी पुरावे लपवल्याप्रकरणी आरोपीच्या सहकारी रिक्षा चालकालाही सहआरोपी बनवले आहे.
पीडितेची प्रकृती धोक्याबाहेर
पीडित विद्यार्थ्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. तिच्यावर इंदूरमध्ये उपचार सुरू आहेत.
संपूर्ण घटनेवर एक नजर
- घरच्यांशी भांडण करून आठवीतील विद्यार्थिनी सपनाने उज्जैन गाठले होते.
- 25 सप्टेंबर रोजी दुपारी 3.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत उज्जैनमधील सहा जणांशी तिचा संपर्क झाला होता.
- पहाटे चार ते पाचच्या दरम्यान विद्यार्थिनीवर बलात्कार झाला.
- पोलिसांनी महाकाल पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला.
- हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणण्यासाठी 28 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्यात आली होती.
- पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करत ऑटो चालकाला अटक केली.
- या संपूर्ण प्रकरणात 14 किलोमीटरच्या परिघात सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले.
- पोलिसांनी तीन ऑटोचालकांसह 6 जणांची चौकशी केली.
- पुरावे लपवल्याप्रकरणी पोलिसांनी नीलगंगा पोलिस ठाण्यात आणखी एका ऑटोचालकाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
ही बातमी वाचा: