Vasai News : अनेकदा लहान मुले आपल्या पालकांकडे खेळण्यांसाठी, चॉकलेटसाठी अशा विविध गोष्टींसाठी हट्ट करत असतात. आजकालच्या मुलांच्या मागण्या देखील अधिक वाढल्या आहेत. मुलांना महागडी खेळणी त्यात इलेक्ट्रीक कार अशा विविध मागण्या आहेत. अनेकदा मुलं आपल्या हट्टासाठी चूकीचं पाऊलही उचलतात.  वसईत देखील असंच काहीसं घडलं असून दोन दहा वर्षीय मुलांनी खेळण्यातील कारसाठी चक्क बंद घराची काच फोडून चोरी केली आहे.


वसई पश्चिमेच्या साई बाबानगर परिसरात काही दिवासांपूर्वी चोरी झाली होती. एका घरातून अठरा हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली होती. वसईच्या माणिकपूर पोलिसांनी तपास केल्यावर त्यांना त्याच परिसरात दोन लहान मुले महागडी कार खरेदी करण्यासाठी एका खेळण्यांच्या दुकानात गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या दोघां मुलांकडे रक्कमेची तपासणी केल्यावर, त्यांनीच चोरी केल्याची कबूली दिली. या दोन लहान मुलांनी वसई पश्चिमेच्या नवयुग नगरमधील एका बंद घरातील टॉयलेटच्या खिडकीतून काच तोडून आत प्रवेश केला होता. त्यांनी घरातून अठरा हजारांची रोख रक्कम लंपास केली होती. पोलिसांनी अधिक विचारपूस केल्यावर त्या दोघांनी, ही चोरी इलेक्ट्रीक कार खरेदी करण्यासाठी केल्याच कबूल केलं.   


समज देऊन पोलिसांनी सोडले


माणिकपूर पोलिसांनी दोघां अल्पवयीन मुलांकडून चोरीची रक्कम हस्तगत केली आहे. पोलिसांनी या दोन्ही मुलांच्या आई-वडिलांना बोलावून, त्यांना समज देऊन सोडून दिले आहे. दरम्यान आपली पाल्य काय करतात याची काळजी प्रत्येक आई वडिलांनी घेणं आता गरजेचं आहे. हे या घटनेतून समोर आले आहे. 


हे ही वाचा-



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live