Torres Jewellers Scheme Scam : दादर (Dadar Crime), नवी मुंबई, मिरा-भाईंदरच्या पॉश एरियामध्ये ज्वेलरी शॉप उघडलं. त्यानंतर ग्राहकांना प्रलोभनं दाखवून मोठा स्किम जाहीर केली. एवढे गुंतवल्यावर तेवढा परतावा मिळणार, तेवढे दिले तर इतके मिळतील, असं सांगून समजावून विश्वास संपादन केला आणि एक दिवस सगळी दुकानं बंद करून पसार झाले, ही कहानी आहे... 2025 मधला सर्वात मोठा स्कॅम ज्या कंपनीनं केला, त्या टोरेसची. अनेकांना या कंपनीनं चुना लावला.
टोरेस कंपनी गुंतवणूकदारांना सोनं-चांदीऐवजी मॉयसॅनाइट खरेदी करण्याचा आग्रह धरत असे. त्यावर सर्वाधिक परतावा देखील देण्यात आला, जो साप्ताहिक 8 ते 11 टक्क्यांपर्यंत होता. कंपनीच्या वेबसाईटनुसार, प्लॅटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेडचे नोंदणीकृत कार्यालय गिरगावातील ऑपेरा हाऊस इमारतीत आहे. इम्रान जावेद, सर्वेश सुर्वे आणि ओलेना स्टाइन, असे कंपनीचे तीन संचालक आहेत. तिन्ही संचालकांनी त्यांचा निवासस्थानाचा पत्ता कंपनीचा पत्ता म्हणून दाखवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये नोंदणीकृत 'प्लॅटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीनं 2024 मध्ये 'टोरेस' ब्रँड अंतर्गत दादरमध्ये 30 हजार स्क्वेअर फुटांचे आउटलेट उघडले. यानंतर कंपनीने मीरा-भाईंदरसह इतर ठिकाणी आऊटलेट्स उघडले.
मुलांच्या शिक्षणाचा विचार केला अन् तिथेच चुना लागला...
मार्केटिंग फिल्डमध्ये असलेल्या रतनकुमार जैस्वाल यांची आवस्थाही वेगळी नाही. वर्षभर काम केल्यानंतर चार पैसे शिल्लक ठेवताना नाकी नव येणाऱ्या रतनकुमार यांना टोरेस कंपनीनं 50 हाजारांचा चुना लावला आहे. स्वत: च्या आणि दोन मुलांच्या नावानं 50 हजारांची गुंतवणूक रतनकुमार यांनी टोरेस कंपनीत केली होती. महिन्याला 44 टक्के आल्यास दिलेले पैसे दोन महिन्यांत निघून पुढील पैशांनी मुलांचे शिक्षण होईल, या आशेवर रतनकुमार जैस्वाल होते. मात्र त्यांचं हे स्वप्न भंग झाले आहे. मार्केटिंग फिल्ड मध्ये स्वतः असूनही टोरेस कंपनीच्या मार्केटिंगला फुकल्याने त्यांनी स्वतालाच कोसले.
डायमंडच्या नावाखाली गुंतवणूकदारांना दिले Moissanite डायमंड
टोरेस कंपणीने डायमंडच्या नावाखाली गुंतवणूकदारांना Moissanite डायमंड दिल्याचं समोर आलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून डायमंड व्यावसायिक असलेल्या संजय गावडे यांनी याबाबत खुलासा केला आहे. खरा डायमंड घेताना आयजीआय सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे. त्या जागी टोरेस कंपणीनं बनावट डायमंड देत स्वतःच्या नावानं सर्टिफिकेट दिल्याचं सांगितलं आहे. टोरेस कंपनीनं केलेल्या फसवणुकीचा एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. कोट्यवधींची फसवणूक असल्यानं आर्थिक गुन्हे शाखेकडून याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :