Thane Crime News:  कारवाईसाठी आलेल्या पोलिसांना पिटाळून लावण्यासाठी महिलांनी चक्क विवस्त्र होत धिंगाणा घातला. त्यामुळे झालेल्या गदारोळात या महिलांना पळ काढला. आता, पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. कल्याणमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी महिलांनी असे पाऊल उचलल्याने सगळीकडे या घटनेची चर्चा होत आहे. 


प्रकरण काय?


कल्याण रेल्वे पोलिसांनी (Kalyan Railway Police) एका मोबाईल चोराला अटक केली. त्याने चोरलेला मोबाईल राहत असलेल्या ठिकाणी लपवून ठेवला होता. हा मोबाईल घेण्यासाठी चोर राहत असलेल्या ठिकाणी गेलेल्या  पोलिसांना पिटाळून लावण्यासाठी तीन महिलांनी चक्क आपले कपडे उतरवले. हा प्रकार पाहून पोलिसांनाच घाम फुटला. कसे बसे पोलिसांनी ही परिस्थिती शांत केली. या धिंगाणा घालणाऱ्या या महिलांनी गर्दीचा फायदा घेत तेथून काढता पाय घेतला.


कल्याण रेल्वे स्थानकात चोरीच्या घटना घडत असतात. असाच एक प्रकार काही दिवसापूर्वी घडला होता. एका प्रवाशाचा मोबाईल चोर घेऊन पसार झाला. या प्रवाशाने कल्याण जीआरपीमध्ये तक्रार दिली. या तक्रारीनंतर कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पाोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला. ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. पोलिसांनी चोराला अटक केली. 


संजय भोसले असे या चोराचे नाव आहे. त्याला अटक केल्यानंतर जेव्हा पोलिसांनी चोरलेला मोबाईल कुठे आहे. तेव्हा त्याने सांगितले की, तो मोबाईल घरी आहे. महिला पोलिसांचे पथक त्याच्या घरी पोहचले. पोलिसांना पाहताच घरातील तीन महिलांनी धिंगाणा घालायला सुरुवात केली. अंगावरील कपडे काढून जोराने आरडाओडा सुरु केला. कल्याण रेल्वे यार्डापासून ते कर्पे वाडी परिसरात हा धिंगाणा सुरु होता. कसे बसे पोलिसांनी ही परिस्थिती शांत केली. हा धिंगाणा घालणाऱ्या या महिलांनी गर्दीचा फायदा घेत तेथून काढता पाय घेतला. कल्याण जीआरपीने सार्वजनिक ठिकाणी कपडे काढून धिंगाणा घालणाऱ्या महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.


महिलेला 'आय लव्ह यू' म्हणताच उपनिरीक्षकाला जमावाने चोपले; छ. संभाजीनगरमधील घटना


दीड महिन्यापूर्वी दारूच्या नशेत धिंगाणा घालून महिलांची छेड काढल्याप्रकरणी निलंबित असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने पुन्हा दारू पिऊन धिंगाणा घालत महिलेची छेड काढल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) मयूरबन कॉलनीतील उघडकीस आला आहे. त्याने आधी महिलेला 'आय लव्ह यू'  म्हटलं आणि पुन्हा नंतर बुलेटवरून येत महिलेचा हात धरला. दरम्यान याबाबत कॉलनीवासीयांना माहिती मिळताच त्यांनी या  निलंबित पोलीस उपनिरीक्षकाला बेदम चोप दिला आहे. विशेष म्हणजे, दीड महिन्यापूर्वी देखील त्याने दारूच्या नशेत असाच प्रकार केला होता. अनिल बोडले असे निलंबित पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे.