Amit Mishra in IPL 2023 : हैदराबादविरोधात लखनौ संघाने अमित मिश्राला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय. 40 वर्षीय अमित मिश्रा याने 2021 मध्ये अखेरचा आयपीएल सामना खेळला होता. त्यावेळी तो दिल्ली संघाचा सदस्य होता. आजा अमित मिश्रा याने लखनौ संघाकडून पदार्पण केलेय. आयपीएलमध्ये अमित मिश्रा याने दमदार कामगिरी केलेली आहे. पण वाढत्या वयामुळे लिलावात त्याला मोठी बोली लागली नव्हती. आज अमित मिश्रा लखनौकडून कशी कामगिरी करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 


केएल राहुल याने नाणेफेकीचा कौल गमवाला. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघात काही बदल झाले. लखनौने दुखापतग्रस्त क्रृष्णप्पा गौतम याच्या जागी अमित मिश्राला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले. अनुभवाच्या जोरावर अमित मिश्रा प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांची दांडी गुल करु शकतो. 


आयपीएलमध्ये अमित मिश्राची कामगिरी कशी ?


40 वर्षीय अमित मिश्रा याने आयपीएलमध्ये अनेक विक्रम केले आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात तो आघाडीच्या पाच गोलंदाजामध्ये आहे.  
 आयपीएलमध्ये अमित मिश्रा याने 154 सामन्यात 24 च्या सरासरीने 166 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा अकॉनमी रेट 7.36 इतका राहिलाय. याशिवाय अमित मिश्रा याने आयपीएलमध्ये हॅट्ट्रीक घेण्याचा पराक्रमही केलाय. आता तो 40 व्या वर्षी कशी कामगिरी करतो.. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणा आहे. पियुष चावला याने मुंबईकडून गोलंदाजी करताना दमदार कामगिरी केली होती, आज अमित मिश्रा कशी गोलंदाजी करतो, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 


हैदराबादने नाणेफेक जिंकली -


सनरायजर्स हैदाराबादचा कर्णधार एडन मार्करम याने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघ प्रथम गोंलदाजी करणार आहे. एडन मार्करम याचे हैदराबाद संघात पुनरागमन झालेय. त्याने नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे. पहिल्याच सामन्यात नाणेफेकीचा कौलही जिंकला आहे. अमित मिश्रा याला लखनौने प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय. क्विंटन डि कॉक याला लखनौच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही. लखनौचा संघ काइल मायर्स याच्यासोबत गेला आहे. 


खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक आहे. मोठी धावसंख्या उभारता येईल. संघातील प्रत्येक खेळाडू चांगल्या स्पिरीटने आणि उर्जेने खेळेल. अनमोलप्रीत सिंह सलामीला येणार आहे, असे नाणेफेकीनंतर एडन मार्करम याने सांगितले.  आजच्या सामन्यात आम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करणार आहे. मार्क वूड याला ताप असल्यामुळे तो या सामन्याला मुकणार आहे. त्याशिवाय मागील सामन्यात आवेश खान दुखापतग्रस्त झाला होता, तोही या सामन्यात खेळणार नाही, असे राहुलने सांगितले.