ठाणे : ठाण्यातील मखमली तलाव येथील नीलकंठ सोसायटी मध्ये राहणारे व सोन्या-चांदीचे व्यापारी भरत जैन यांचे आपहरण होऊन हत्या झाली होती. या हत्येमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली होती. याचा तपास करण्यासाठी नौपाडा पोलिसांनी दोन पथक तयार केली आणि तपासास सुरुवात केली. सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांचा आधार घेऊन पोलीसनी नवी मुंबई येथील सुभाष बाबुराव सुर्वे या चारचाकी चालकाला ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेतल्या नंतर त्याने आपले साथीदार अतुल जगदीश प्रसाद मिश्रा, निलेश शंकर भोईर आणि बळवंत चोळकर यांच्या सोबत मिळून भरत जैन यांचा खून करून त्यांचे दुकान लुटल्याचे कबुल केले.


पोलीसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी अतुल मिश्रा हा भरत जैन राहत असलेल्या सोसायटी मध्ये अडीच वर्षा पूर्वी वॉचमन म्हणून कामास होता. त्यामुळे त्यास भरत जैन यांचे ज्वेलर्सचे दुकान असल्याचे तसेच त्याचा दुकानात जाण्या-येण्याचा मार्ग माहिती होता. त्यानेच या सर्व गुन्ह्याचा प्लॅन केला आणि 14 ऑगस्टला जैन यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून किडनॅप केले. 


या वेळी आरोपी अतुल मिश्रा याला भरत जैन यांनी ओळखले त्यामुळे आपली ओळख पोलिसांना सांगेल आणि आपले बिंग फुटेल या भीतीने आरोपींनी भरत जैन यांचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. त्यांच्या खिशातील दुकानाची चावी काढून घेऊन त्यांचा मृतदेह हात पाय बांधून कळवा खाडीत फेकून दिला. त्यानंतर आरोपींनी बी के ज्वेलर्स हे दुकान चावीने उघडून दुकानातील 1 लाख 24 हजार रुपयांचे चांदीचे दागिने व भांडी चोरी केली. 


पोलिसांनी यातील अतुल मिश्रा आणि निलेश भोईर यांना उत्तर प्रदेशमध्ये पळून जाताना अटक केली तर बळवंत चोळकर याला आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याने अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी एक रिव्हॉल्व्हर, एक गावठी कट्टा आणि एक काडतुस जप्त केले आहे. 


महत्वाच्या बातम्या :