Terrorist Arrested In Mumbai: पंजाबमधील एका दहशतवाद्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. चरतसिंग इंद्रजितसिंग करिसिंग कारज सिंग, असं अटक केलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. त्याच्याविरुद्ध 8 गुन्हे दाखल आहेत. मार्च 2022 पासून तो पंजाबच्या कपूरथला तुरुंगातून 2 महिन्यांच्या पॅरोल रजेवर बाहेर होता. त्याच्या पॅरोल कालावधीत त्याने त्याच्या साथीदारांसह पंजाब पोलिस, इंटेलिजन्स हेड क्वार्टर, मोहाली येथे 9 मे 2022 रोजी रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड (RPG) ने हल्ला केला होता. त्याच्या ठावठिकाणाबाबत महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार एटीएसच्या पथकाने त्याला मालाड, मुंबई येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तो सध्या कॅनडामध्ये असलेल्या लखबीर सिंग लांडा नावाच्या फरार दहशतवाद्याच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. पुढील आवश्यक कारवाईसाठी अटक आरोपीला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


याबाबत माहिती देताना पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले की, पोलिस इंटेलिजन्स मुख्यालयावरील आरपीजी हल्ल्यातील मुख्य आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चरतसिंग याने दोघांसह हा हल्ला केला. याशिवाय निशान सिंगचीही यात भूमिका आहे. यानेच दोघांना आश्रय दिला होता आणि आरपीजी पुरवले होते. निशान सिंगला पंजाब पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखवीर सिंग लांडा हा पंजबामधील तरनतारनचा रहिवासी आहे. तो हरविंदर सिंग रिंडा यांच्या जवळचा आहे. सध्या तो कॅनडामध्ये आहे. 2017 मध्ये तो डीश सोडत फरार झाला. पोलिस इंटेलिजन्स हेडक्वार्टरवर हा हल्ला पाकिस्तानच्या आयएसआयच्या मदतीने करण्यात आला होता. दरम्यान, यापूर्वी दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात एका अल्पवयीन मुलासह दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला अर्शदीप सिंग हरियाणामध्ये 4 ऑगस्ट रोजी सापडलेल्या आयडी प्रकरणाशी संबंधित होता. त्याचवेळी अल्पवयीन दहशतवाद्याला सलमान खानला मारण्याचे कंत्राट देण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई आणि जग्गू भगवानपुरिया टोळीने दीपक सुरकपूर आणि मोनू डागर यांच्यासह सलमान खानला मारण्याचे काम अल्पवयीन मुलाला दिले होते. दरम्यान, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Karnataka Bhavan : सीमाभागात मराठी भाषिकांची गळचेपी होत असताना महाराष्ट्रात 'कर्नाटक' नाव कशासाठी? कणेरी मठातील कर्नाटक भवनला शिवसेनेचा विरोध