Diwali Food and Recipe : दिवाळीचा (Diwali 2022) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच सगळीकडे दिवाळीची लगबग पाहायला मिळतेय. दिवाळी म्हटलं की साफसफाई, नवीन वस्तू, फराळ आणि फटाके या गोष्टी अगदी नजरेसमोर येतात. दिवाळीत फराळ हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण या फराळांवर ताव मारताना दिसतो. त्यामुळे घरातील गृहीणीची आतापासूनच फराळ बनविण्यासाठीची तयारी सुरु असेल.
सध्याच्या काळात निरोगी आणि हेल्दी लाईफस्टाईलला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे जर तुमचा फराळसुद्धा हेल्दी असला तर..? आज आम्ही तुम्हाला अशीच एक हेल्दी फराळाची रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी म्हणजेच खुसखुशीत शंकरपाळ्यांची. आतापर्यंत तुम्ही अनेक शंकरपाळ्या खाल्ल्या असतील पण गव्हाच्या पिठापासून बनवलेली शंकरपाळी तुम्ही कधी खाल्ली आहे का? नसेल, तर ही घ्या साहित्य आणि कृती.
गव्हाच्या पिठाची शंकरपाळी :
साहित्य :
- गव्हाचं पीठ 2 कप
- 1/4 देसी घी
- साखर पाऊण कप
- दूध 1/3 कप
- 1 चमचा तीळ
- 1 चमचा इलायची पावडर
कृती :
गव्हाच्या पीठाची शंकरपाळी बनविताना सर्वात आधी एक मोठा बाऊल घ्या. त्यात 2 कप गव्हाचं पीठ आणि 1/4 कप घी घ्या. त्यानंतर पाऊण कप साखरेची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्या. तुम्हाला शंकरपाळी जास्त गोड दवी असेल तर 2 कप साखर घेऊ शकता. आता या सााखरेच्या पावडरमध्ये 1/3 कप दूध घालून मिश्रण एकत्र मिक्स करा. हे मिश्रण छान एकजीव झाल्यानंतर ते बाजूला ठेवा. आणि गव्हाच्या पीठात आता 1 चमचा तीळ आणि 1 चमचा इलायची पावडर घालून त्यात साखर आणि दुधाच्या पाण्याचं तयार केलेलं मिश्रण एकजीव करा. त्यानंतर 15 मिनिटं या मिश्रणाला छान मुरु द्या. त्यानंतर पीठानुसार त्याचे मोठे गोळे करून लाटायला घ्या. आणि त्याचे बारीक काप करा. आता एका कढईत गरम तेल तापत ठेवून त्यात शंकरपाळ्या सोडा. आणि छान लालसर रंग आल्यावर अलगद काढून सर्व्ह करा.
महत्वाच्या बातम्या :
Diwali 2022: दिवाळीत खमंग आणि कुरकरीत चकली बनवायचीये? जाणून घ्या ही सोपी रेसिपी