Tamil Nadu News : शाळेपासून प्रेम असलेल्या प्रियकरासोबत प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्याने प्रियकराने तरुणीला जिंवत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूमध्ये घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकर वेत्रिमनी याला बेड्या ठोकल्या आहेत. प्रियकर वेत्रिमनीने तरुणीवरील प्रेमासाठी लिंग परिवर्तन शस्त्रक्रियाही केली होती, पण प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिला. यानंतर राग अनावर झाल्याने त्याने तिला संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं.
शाळेपासून प्रेम, प्रेयसीसाठी लिंगही बदललं
चेन्नईच्या थलंबूर भागातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका आरोपीने आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या दिवशीच तिची हत्या केली. आरोपी हा मृत तरुणीचा मित्र आहे. त्याने मैत्रिणीशी लग्न करण्यासाठी लिंग बदलून पुरुष झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर नंदिनीने तरुणाशी लग्न करण्यास नकार दिल्याने आरोपी वेत्रिमनीला राग आला. त्याने नंदीनीचे हात-पाय बांधून तिच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि तिला जिवंत जाळलं.
लग्नावेळी नकार दिल्याने जिवंत जाळलं!
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तामिळनाडूतील चेन्नईतील 24 वर्षीय तरुणी आर नंदीनी हिची तिचा मित्र वेलीमारण याने जिवंत जाळून हत्या केली. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपी मित्र वेत्रिमनी आणि पीडिता तरुणी लहानपणीपासूनचे मित्र असून एकाच शाळेत शिकत होते. वेत्रीमनीने काही दिवसांपूर्वी लिंग बदल शस्त्रक्रिया केली, त्याचं आधीचं नाव पांडी माहेश्वरी होतं. लिंगबदल शस्त्रक्रिया करून पांडी माहेश्वरी वेत्रिमनी झाला. आरोपी आणि पीडिता एकत्र मुलींच्या शाळेत शिक्षण घेत होते. यावेळी दोघींची एकदम खास मैत्री होती. यानंतर पांडी माहेश्वरीने नंदीनीसोबत लग्न करण्यासाठी लिंगबदल शस्त्रक्रिया केली. पण, त्यानंतर नंदीनीला तिचं बदललेलं स्वरुप पटलं नाही. ती त्याच्यापासून दूर-दूर राहू लागली.
मैत्रिणीसोबत लग्न करण्यासाठी लिंग परिवर्तन शस्रक्रिया
मीडिया रिपोर्टनुसार, वेत्रिमनीसोबत लग्न करण्यासाठी पांडी माहेश्वरीने लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया केली, पण त्यानंतर नंदिनीने लग्न करण्यास नकार दिला. यानंतर वेत्रिमनीने नंदिनीला तिच्या वाढदिवसादिवशीच संपवण्याचा घाट घातला. चेन्नईच्या दक्षिणेकडील थलंबूरमध्ये शनिवारी ही भीषण घटना घडली. नंदिनीच्या वाढदिवसानिमित्त तिला पार्टीसाठी बोलावून वेत्रिमनीने तिची हत्या केली.
नेमकी घटना काय?
आर नंदिनीचा 26 व्या वाढदिवस साजरा करण्यासाठी वेत्रिमनीने तिला बोलावलं. त्यांनी संपूर्ण दिवससोबत घालवला, खरेदी केली, अनाथ आश्रमाला भेट दिली. यानंतर घरी जाण्याच्या वेळी वेत्रिमनीने गाडी निर्जनस्थळी थांबवली आणि गिफ्ट देण्याच्या बहाण्याने नंदिनीच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधली आणि मस्करी करत हात-पायही बांधले. यानंतर वेत्रिमनीने ब्लेडने नंदिनीच्या शरीरावर वार करण्यास सुरुवात केली. तिच्या मानेवर आणि हातापायावर वार केले. यानंतर त्याने नंदिनीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळ्याचा प्रयत्न केला आणि तिथून पळ काढला.
नंदिनी बचावासाठी ओरडत असताना आजूबाजूने जात असलेल्या नागरिकांनी तिचा आवाज ऐकून पोलिसांना माहिती दिली. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच नंदिनी मृत्यू झाला. रुग्णालयात जाण्याआधी नंदिनीने पोलिसांना फोन नंबर दिला होता, तो वेत्रिमनीचा होता. पोलिसांनी फोन केल्यानंतर वेत्रिमनीने रुग्णालयात जाऊन ओळख पटवली. यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान नंदिनीचा मृत्यू झाला. यानंतर वेत्रिमनी फरार झाला. यानंतर पोलीस चौकशीत हे प्रकरण उघडकीस आलं.