Solapur Crime News: देशभरात गेल्या काही दिवसात महिलांवर घडणाऱ्या (Women Sexual assault Case) अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असताना राज्यभरातून अनेक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत . अशाच एका धक्कादायक प्रकाराने पंढरी हादरली आहे. जागरण गोंधळास आलेल्या एका तरुणीवर लग्नाचं आमिष दाखवत अत्याचार केल्याची माहिती पुढे आलीये. जागरण गोंधळाचा कार्यक्रम करण्यास आलेल्या तरुणीबरोबर ओळख करून घेत लग्नाचं आमिष दाखवून वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवल्याप्रकरणी या तरुणावर पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास किसन गेजगे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून पिडीत तरुणी २७ वर्षांची असून पुण्याची रहिवासी आहे. कुटुंबासह जागरण गोंधळाचे कार्यक्रम करत २०२२ मध्ये ती पंढरपुरात आली होती. यावेळी लग्नाचे आमिष दाखवत तरुणाने जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
ओळख वाढवली, लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक संबंध
पिडीत तरुणीशी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमादरम्यान आरोपीने ओळख वाढवली. त्या ओळखीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले. डिसेंबर २०२२ मध्ये विकास याने तिला पंढरपुरात आणून भाड्याने खोली करून ठेवले. यादरम्यान २७ ऑगस्टपर्यंत २०२४ वेळोवेळी त्याने लग्नाचे अमिष दाखवत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यासाठी नकार दिल्यानंतर तो हाताने मारहाण करायचा.
पिडीतेची पोलिसांकडे फिर्याद
जागरण गोंधळाचे कार्यक्रम करण्यास नकार दिल्यावरही त्याने मारहाण केली. तसेच आपल्या पिकअप वाहनाचे हप्ते भरण्यासाठी म्हणून त्याने तिच्याकडून एकूण ७५ हजार रूपये घेतले. अखेर लग्न करण्याबाबत तसेच वाहनाचे हप्ते भरण्यासाठी दिलेल्या पैशांविषयी विचारणा केल्यानंतर विकास याने मारहाण केली, अशा आशयाची फिर्याद पिडीतीने येथे येऊन शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तरुणावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
शिक्षकांनी केला 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग
बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असताना चंद्रपूरच्या (Crime News) वरोरा येथील एका नामवंत कनिष्ठ महाविद्यालयात असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. यात दोन शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडलीय. 17 वर्षीय विद्यार्थिनी बीए प्रथम वर्षात शिक्षण घेत असून वाढदिवसाचं निमित्त करून या विद्यार्थिनीला शिक्षकांनी आपल्या रूमवर बोलावून अत्याचार केल्याची माहिती पुढे आली आहे.
हेही वाचा: