Jalgaon Crime News : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आल्याची घटना जामनेर तालुक्यात घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना चिंचखेड गाव शिवारात घडल्याचं समोर आलं. चिंचखेड गाव परिसरात राहणारे आदिवासी कुटुंब मजुरीसाठी बाहेर गेले असताना, घरात असलेल्या सहा वर्षीय मुलीला फुस लाऊन गावाबाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार करत हत्या केल्याचे उघड झाले आहे. 


रात्री 11 वाजता हा प्रकार उघडकीस


दरम्यान, या घटनेतील मुलीचे आई वडील मजुरी करुन घरी परतले असता त्यांना मुलगी घरात दिसून आली नाही. त्यानंतर आई वडिलांनी मुलीची शोधा शोध सुरु केली. यावेळी  चिमुकल्या मुलीचा गावाबाहेर केळीच्या बागेत रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला. काल रात्री 11 वाजता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. गावातील एका संशायीत तरुणाचा शोध सुरु केला आहे.या घटनेत ज्या क्रूरतेने आरोपीने या बालिकेवर अत्याचार करुन तिची हत्या केली आहे. ती पाहता आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.


आरोपीला फाशी देण्याची मागणी


दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देकील नागरिकांनी केली आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळं या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी लोक संघर्ष मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कैलास मोरे यांनी केली आहे.


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! 78 वर्षीय वृद्धेला तिशीतील तिघांनी शेतात नेलं, एकाने गाठला कूकर्माचा कळस, अत्याचार करुन सोडलं!