Dombivli MIDC Fire डोंबिवली: डोंबिवलीतील एमआयडीसीमधील इंडो अमाईन्स (Indo Amines) कंपनीत आग लागल्याची घटना समोर येत आहे. यावेळी अनेक स्फोटांचे आवाजही येत असल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये घबराट झाली आहे. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या आगीचे लोळ पाहून परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. सध्या या कंपनीच्या आतमधे कुणीही अडकलं नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 


या घटनेनंतर बाजूला असणाऱ्या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घरी पाठवण्यात आलं आहे. आजूबाजूच्या परिसरातील कारखान्यातील कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. आग लागलेल्या इंडो अमाईन्स कंपनीच्या परिसरात अनेक विविध कारखाने आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आगीवर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे. सदर घटनेनंतर परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. गेल्या काही दिवासांमध्ये डोंबिवलीतील एमआयडीमध्ये आगीच्या अनेक घटना घडत आहे. मात्र यानंतरही राज्य सरकारने धडा घेतला नाहीय का?, अशा सवालही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 


डोंबिवली एमआयडीत अनेक केमीकल कंपन्या आहेत. साधारण 15 दिवसांपूर्वीच या एमआयडीसीमधील अभिनव कंपनीत एक मोठा स्फोट झाला होता. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा आग लागल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसल्याचे दिसून येत आहे. विविध कंपन्यांनी तातडीने सगळ्या कामगारांना सुरक्षित पणे बाहेर काढण्यात आले.


आगीबाबत लेटेस्ट अपडेट काय?


सदर घटनास्थळी मानपाडा पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचारी ०१-रुग्णवाहिकेसह उपस्थित आहेत. सद्यस्थितीत घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही. 


सदर घटनास्थळी उपस्थित अग्निशमन दलाचे वाहने पुढीलप्रमाणे:-
१) डोंबिवली एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे जवान ०२-वॉटर टेंडरसह उपस्थित आहेत.
२) कल्याण अग्निशमन दलाचे जवान ०२-फायर वाहनासह उपस्थित आहेत.
३) पलावा एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह उपस्थित आहेत.
४) ठाणे अग्निशमन दलाचे जवान ०१-हायराईज फायर वाहनाचा उपस्थित आहेत.


प्रवीण दरेकर काय म्हणाले?


सदर घटनेला यंत्रणाच जबाबदार आहे. यावेळी कोणाचं सरकार आहे, कोणाचं नाही, हा प्रश्न नाही. अशा घटनेमुळे नाहक नागरिकांचे जीव जात आहेत. आता जेवढ्या एमआयडीसी आहेत, त्याचं ऑडिट झालं पाहिजे, एक स्वतंत्र्य यंत्रणा स्थापन केली पाहिजे, असं भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले.


वैशाली दरेकर काय म्हणाल्या?


डोंबिवली ज्वालामुखीच्या तोंडात वसवली गेलीय की काय?, असं आम्हाला आता वाटू लागलं आहे. फायर ऑडिट केलं होतं का?, कंपनीने योग्य ती सुरक्षा यंत्रणा होती का?, असे विविध प्रश्न समोर येत आहे, असं ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर म्हणाल्या.



इतर बातम्या:


डोंबिवली स्फोटानंतर 8 दिवसांनी ढिगाऱ्यावर आढळलं पॅन कार्ड, पण 'भारत' बेपत्ताच; पतीसाठी पत्नीचे दररोज हेलपाटे


Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसीमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट, धुराचे प्रचंड लोट, इमारतींच्या काचा फुटल्या