Nagpur Crime News नागपूर : राज्याच्या उपराजधानीमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नागपूरच्या (Nagpur Crime) मोवाड (Mowad) येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आले आहे. विजय पचोरी असे या प्रकरणातील वडिलांचे नाव आहे. तर पत्नी बालाबाई पचोरी, गणेश पचोरी, दीपक पचोरी असे इतर मृतकांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र या घटनेने नागपूर जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे.


तर या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे चार मृतदेहांपैकी तीन मृतदेहाचे हात पाठीमागे बांधून लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. तसेच प्रकरणातील वडिलांनीच तिघांच्या हत्येनंतर स्वत: आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप तरी या प्रकरणामागील कारण स्पष्ट झाले नाही. पोलीस या प्रकरणाचा आता अधिक तपास करत असून तपासाअंतीच या प्रकरणामागील कारण कळू शकणार आहे.        


शिक्षकानेच आख्ख्या कुटुंबासह आयुष्य संपवलं?


मिळालेल्या प्राथमिक  माहितीनुसार, या प्रकरणातील वडील विजय पचोरी हे सेवानिव्रुत्त शिक्षक आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या व्यवसायातील आर्थिक तंगीमुळे कुटुंबात आधीच वाद सुरु सुरू होता. त्यामुळे या वाद अधिक विकोपाला गेला असावा आणि त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र दुसरीकडे प्रकरणातील चार मृतदेहांपैकी तीन मृतदेहाचे हात पाठीमागे बांधून लटकल्या अवस्थेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रकरणातील वडिलांनीच तिघांची हत्या केली असावी आणि हत्येनंतर स्वत: आत्महत्या तर केली नाही ना? अशीही शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. मात्र, घटनेची सत्यात पोलीस तपासतूनच पुढे येणार आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 


वाशिम जिल्ह्यात 48 तासात दोन हत्या,  हत्येच्या घटनेने जिल्हा हादरला! 


वाशिम जिल्ह्यात काही तासात दोन वेगवेगळ्या हत्येच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे हत्याच्या घटनेने वाशिम जिल्हात मोठी खळबळ माजली आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील शिंगणापुर  इथं क्षुल्लक कारणावरून एका 30 वर्षीय युवकाचा काही तरुणांनी बेदम मारहाण केली. दरम्यान या घटनेत युवकाचा मृत्यू झाला आहे. शिवमंगल भोसले असं मृत व्यक्तीचे नाव असून या तरुणाचं वय 30 वर्ष असल्याचं कळते आहे. दरम्यान,  या प्रकरणात शेतीच्या कामावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होतेय. या प्रकरणी काही आरोपी ताब्यात घेतल्याचं कळते असून घटनेत अंदाजे 10 आरोपीचे नाव आहेत. कारंजा ग्रामीण पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.


तर रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक गावातील शेतशिवारात वास्तव्यास असणाऱ्या एक महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडलीय. मात्र, हत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. कमल दशरथ पारवे अस मृतक महिलेचं नाव असून महिलेचं वय अंदाजे-55 वर्षे असल्याचं कळते आहे. मृतक महिलेचे पती हे सुद्धा यात गंभीर जखमी असल्याचं कळते आहे. रिसोड पोलीस सध्या घटनेचा तपास करत आहे. मात्र 
वाशिम जिल्ह्यात  हत्या, चोरी, सह इतर गुन्ह्याच्या घटनेत मोठी वाढ होत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 


हे ही वाचा :