ठाणे : शहापूरमध्ये ज्वेलर्स दुकानासमोर झालेल्या गोळीबारात दुकानाचा कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ठाण्यामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. पण त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनमुळे शहरात खळबळ उडाली आहे तर व्यापारी वर्गात भीती निर्माण झाली आहे.
शहापूर शहरालगतच्या गोठेघर हद्दीतील पंडितनाका येथील महालक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानासमोर गोळीबार झाल्याची घटना शनिवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडली. दुकानाचे कामगार आणि सेल्समन दिनेश चौधरी हे दुकान बंद करून निघाले असता एका दुचाकीवरून आलेल्या दोघा इसमांनी चौधरीवर गोळीबार केला. यात चौधरी हे गंभीर जखमी झाले आणि त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलवण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेरात काय झाले आहे.
गोळीबार करणारे दोघे जन दुचाकीवरुन आले असून घटनास्थळावरून बॅग घेऊन फरार झाले आहेत. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बॅगमध्ये फक्त कागदपत्रे होती. हा गोळीबारी चोरीच्या उद्देशाने झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या गोळीबारामागे इतर काही कारणं आहेत का या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.
गोळीबाराच्या या घटनेमुळे शहापुरात खळबळ उडाली आहे.
शहापूरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या या घटनेचा निषेध म्हणून संतप्त व्यापाऱ्यांनी रविवारी संपूर्ण शहापूर शहारातील बाजारपेठ बंद केले आहे. पोलिस ठाण्यावर मूक मोर्चा काढत घटनेचा लवकरात लवकर तपास करावा आणि आरोपीला अटक करावी अशी मागणी केली. जर 48 तासात आरोपीला अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी केला.
ही बातमी वाचा: