पुणे : पुण्यातील हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या पत्नीचाच हात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची 9 डिसेंबरला अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिनं 5 लाखांची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांचे 2013 पासून अनैतिक संबंध निर्माण झाले. या सर्व प्रकाराची माहिती सतीश  वाघ यांना याबाबतची कुणकुण 2016 मध्ये लागली. यानंतर वाद वाढत गेले. यातूनच पुढे सतीश वाघ यांची हत्या झाली.


2016 ला सतीश वाघ यांना कुणकुण  


मोहिनी वाघच वय सध्या 48  वर्षे असून तिचा प्रियकर अक्षय जावळकर हा 32 वर्षांचा आहे.अक्षय जावळकर हा मोहिनी वाघाच्या मुलाचा मित्र असल्याचं समोर आलं. मुलाच्याच वयाचा असल्याने अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असतील अशी शंका सुरुवातीला कोणाला अली नाही. मात्र,सतीश वाघ यांना हे समजताच मोहिनी-सतीश आणि अक्षय यांच्यामध्ये वाद सुरु झाले होते. सतीश वाघ यांच्याकडून मोहिनी वाघला दरम्यानच्या काळात मारहाण होत होती. अनेक वर्षे त्यांच्यातील वाद धुमसत होता आणि त्यातून सतीश वाघ त्यांची हत्या झाली. 


नेमकं प्रकरण काय?


2001 मध्ये अक्षय जावळकरचे  आई - वडील सतीश आणि मोहिनी वाघ यांच्या फुरसुंगीतील खोलीत भाड्याने राहायला आले . अक्षयचे वय तेव्हा फक्त 9 वर्षांचे होते . अक्षयचे आई वडील वडापावचा व्यवसाय करायचे तर वाघ यांचं ब्लूबेरी नावाचं मोठं हॉटेल त्याच भागात होतं.  सतीश आणि मोहिनी यांचा मुलगाही त्याच वयाचा असल्याने दोघांमध्ये मैत्री झाली आणि अक्षयचे वाघ यांच्या घरी येणेजाणे सुरु झाले. मात्र अक्षय जेव्हा 21 वर्षांचा झाला तेव्हा 2013 मध्ये  त्याचे आणि त्यावेळी 37 वर्षांच्या असलेल्या मोहिनी वाघ यांच्यासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले.
 
अक्षय जावळकर यानं दरम्यानच्या काळात सिव्हिल इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मात्र 2016 ला अक्षयचे लग्न करायचे ठरल्याने अक्षय आणि त्याचे आई वडील वाघ यांची भाड्याची खोली सोडून तिथून जवळच असलेल्या दुसऱ्या भाड्याच्या जागेत राहायला गेले.मात्र लग्नानंतर देखील अक्षय आणि मोहिनीचे प्रेमसंबंध कायम राहिले. हे सतीश वाघ यांना समजल्यावर त्यांच्यात पुन्हा वादांना सुरुवात झाली.मोहिनी वाघ यांनी  त्यामुळे सतीश वाघ यांचा काटा काढायचं ठरवलं . त्यामुळे सगळे आर्थिक व्यवहार देखील आपल्या ताब्यात येतील असं त्यांना वाटलं .अक्षय जावळकरच्या मदतीने त्यांनी हत्येचा कट रचला.


मोहिनी वाघ अन् अक्षयच्या कॉल रेकॉर्डमधून उलगडा 


अक्षय जावळकर यानं त्याच्या मित्रांना या कटात सहभागी करून घेतलं.9 डिसेंबरला मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सतीश वाघ यांचं अपहरण करून अवघ्या पंधरा मिनिंटातच त्यांची हत्या करण्यात आली.त्यांच्यावर तब्ब्ल 70 वार करण्यात आले.मात्र हे पैशांसाठी केलेले अपहरण आहे, असा बनाव करण्यात आला.मात्र, पोलिसांनी मोहिनी वाघ आणि अक्षयची पार्शवभूमी तपासली , दोघांचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि हत्येचा उलघडा झाला. पोलिसांनी या प्रकरणी मोहिनी वाघला देखील अटक केलीय. 



इतर बातम्या : 


Satish Wagh: सतीश वाघ प्रकरणात बायकोच मास्टरमाईंड; पैसे अन् व्यवहारासाठी घरची कारभारीण जीवावर उठली, आधी फक्त हल्ला करण्याची मागणी पण नंतर....


सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक