Satish Wagh murder case : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर (Mla Yogesh Tilakar) यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करुन खून करण्यात (Satish Wagh murder case) आल्याची घटना घडली होती. ही घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली होती. आता प्रकरणातील महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील फरार आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेने फरार आरोपी आतिश जाधव यास धाराशिव येथून ताब्यात घेतलं आहे. 


सतीश वाघ हत्याप्रकरणी याआधी 4 आरोपींना अटक करण्यात आली होती


दरम्यान,  सतीश वाघ हत्याप्रकरणी याआधी 4 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळं या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ही आता 5 झाली आहे. दरम्यान, या प्रकरणातील अधिकचा तपास गुन्हे शाखा करत आहे.


वैयक्तिक कारणास्तव सतीश वाघ यांची हत्या 


सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्या ही वैयक्तिकरणास्तव करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. वाघ (Satish Wagh) यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीने हे सर्व कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पाच पैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली.


नेमकी घटना कशी घडली?


सतीश वाघ यांचं 9 डिसेंबरला पहाटे अज्ञात व्यक्तींकडून अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना चारचाकी गाडीतून अज्ञान स्थळी नेण्यात आलं. सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांतच आरोपींनी सतीश वाघ यांचा गाडीतच खून केला असल्याची माहिती समोर आली आहे. वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकण्यात आलं. सतीश वाघ यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले असून, पाठीवर देखील वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी फेकून दिला. सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. त्यांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरु केला होता. 


सतीश वाघ हे भाजप नेते आणि विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा आहेत. सतीश वाघ हे शेतकरी असून हडपसर परिसरातील मांजरी भागात त्यांची शेती आहे, त्यांचा व्यवसाय देखील आहे. काही हॉटेल्स, लॉन्स आणि शेती असा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. सतीश वाघ यांना दोन मुलं आहेत. दोन्ही मुले महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. कुणाशीही भांडण नसणाऱ्या सतीश वाघ यांचं असं अचानक अपहरण झालं होतं. पुण्यापासून सुमारे 34 किलोमीटरवर असलेल्या उरुळी कांचनच्या पुढे शिंदवणे घाटात त्यांचा हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला आहे. मांजरी ते यवत या प्रवासादरम्यानच वाघ यांचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.


महत्वाच्या बातम्या:


Satish Wagh Case: सतीश वाघ यांची पाच लाखांची सुपारी; चार महिन्यांपूर्वीपासून आखत होते प्लॅन, संधी मिळताच साधला 'डाव', नेमकं काय-काय घडलं?