बीड : सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. खोक्या हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. सतीश भोसलेनं केलेले मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. सतीश भोसले याला प्रयागराजमधून अटक करण्यात आलं आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड पोलिसांनी आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई अटक केली आहे. काही दिवसांपासून फरार असलेला खोक्या अटकेत आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ही माहिती एबीपी माझाला दिलेली आहे.
पोलिसांसमोर खोक्यानं माध्यमांना मुलाखती दिल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला महाराष्ट्रात आणलं जाईल अशी माहिती आहे. खोक्यानं बॅटनं एका व्यक्तीला मारहाण केली होती. त्याचा व्हिडिओ करुन समाजमाध्यमात दहशत निर्माण करण्यासाठी व्हायरल केला होता. आता पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सतीश भोसले याला अटक झालेली आहे. प्रयागराज पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक केली आहे. पोलिसांनी दोन पथकं नेमून देखील त्याला अटक करण्यात आली नव्हती. खोक्या भोसलेला अटक झाली आहे. सध्या तो प्रयागराज पोलिसांच्या ताब्यात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आज यश आलं आहे. गेल्या आठवड्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा सतीश भोसले याला अटक करण्यात आलं आहे. त्याला उद्यापर्यंत बीडमध्ये आणलं जाऊ शकतं.
खोक्या ऊर्फ सतीश भोसलेवर तीन गुन्हे दाखल झाले आहेत. ढाकणे पितापुत्राला मारहाण केली होती, त्याचा गुन्हा दाखल झाला आहे. गांजा घरी सापडल्यानंतर त्याचा देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खोक्या गेल्या दोन आठवड्यांपासून बीडमध्ये फिरत होता पण पोलिसांना तो सापडला नव्हता. सध्या त्याला अटक करण्यात आली आहे.
प्रयागराज पोलीस खोक्या ऊर्फ सतीश भोसले याला बीड पोलिसांच्या स्वाधीन करतील. आमदार सुरेश धस यांनी खोक्या ऊर्फ सतीश भोसले हा केवळ रिल्स करत असल्याचं म्हटलं होतं. खोक्यानं ढाकणे पिता पुत्राला मारहाण करण्याचं प्रकरण समोर आलं होतं. खोक्या फरार असल्यानं सुरेश धस यांची देखील अडचण निर्माण झाली होती. आता खोक्याला अटक केल्यानंतर धस यांची ती अडचण दूर झालीय असं म्हणता येईल.
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत काय म्हणाले?
खोक्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला होता. पोलीस त्याच्या लोकेशनचा शोध घेत होते. खोक्याचं शेवटचं लोकेशन प्रयागराज मिळालं होतं. उत्तर प्रदेश पोलीस आणि प्रयागराज पोलिसांशी समन्वय साधून खोक्याला अटक केली आहे. आमची टीम पोहोचत आहे. उद्या किंवा परवा त्याला इथं आणलं जाईल. दुसऱ्या राज्यात अटक असल्यानं ट्रान्झिट रिमांड करुन ताब्यात घेतलं जाईल. खोक्यावर दोन गुन्हे 307 चे आणि एक गुन्हा एनडीपीएसचा आहे.
सुरेश धस काय म्हणाले?
खोक्याला अटक झाली ही अत्यंत चांगली बाब आहे. अत्यंत चांगली बाब आहे. त्यानं जी चूक केली त्यानुसार त्याला अटक केलेली आहे. कायद्यानुसार कारवाई करावी, असं आमदार सुरेश धस म्हणाले.
सतीश भोसलेला अटक झाल्यानंतर तो पळून गेलाच कसा असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. सतीश भोसलेला अटक केलीय तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेला अटक करा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था पाहायला मिळतेय. बीडमधील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न समोर आले होते.
इतर बातम्या: