Saral Vastu Chandrashekhar Guruji : कर्नाटकातील हुबळीत धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'सरल वास्तू'चे संस्थापक (Saral Vastu)  चंद्रशेखर गुरुजी (Chandrashekhar Guruji) यांच्या हत्येचे वृत्त हाती येत आहे. चंद्रशेखर गुरुजी यांची चाकूचे सपासप वार करुन हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हॉटेलच्या रिसेप्शनजवळ त्यांची चाकूनं वार करत हत्या केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर (Chandrashekhar Guruji) यांची आज मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या हॉटेलमध्ये झालेल्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अनुयायी म्हणून उभे असलेल्या व्यक्तींनी गुरुजींवर हल्ला केला. हल्ल्यानंतर दोघेही तिथून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. चंद्रशेखर गुरुजी (Chandrashekhar Guruji) यांच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओनुसार, हॉटेलच्या लॉबीत दोन कथित अनुयायांनी चंद्रशेखर गुरुजी (Chandrashekhar Guruji)  यांचे चरण स्पर्श केले. त्यानंतर त्यांनी गुरुजीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यानंतर हॉटेलमध्ये गोंधळ उडाला. या गोंधळातच हल्लेखोर पसार झाले. 


काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर (Chandrashekhar Guruji) यांच्या विरोधात काही कर्मचाऱ्यांनी आपल्या थकित पगारासाठी धरणे आंदोलन केले होते. त्यापैकी काही कर्मचाऱ्यांचा यात काही सहभाग आहे का, या अनुषंगानेही पोलीस तपास करत आहेत. चंद्रशेखर गुरुजी हे तीन जुलैपासून हुबळीतील हॉटेलमध्ये वास्तव्य करत होते. त्यांच्या कुटुंबातील एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानिमित्ताने ते हुबळी येथे गेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने तपासाचे निर्देश देत काही सूचना केल्या.


चंद्रशेखर गुरुजींनी (Chandrashekhar Guruji) कंत्राटदार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पुढे त्यांना मुंबईत नोकरी लागली. त्यानंतर चंद्रशेखर (Chandrashekhar Guruji) यांनी वास्तूचे विषयाचं काम सुरू केलं.


इतर महत्त्वाच्या बातम्या: